Join us

Shahrukh Khan : किंग खानचे 'जबरा फॅन' गुजरातवरुन आले अन् थेट मन्नतमध्ये घुसले, दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:01 IST

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे चाहते त्याला भेटण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.

Shahrukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे चाहते त्याला भेटण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. नुकत्याच त्याच्या 'पठाण' (Pathaan) सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. तब्बल ४ वर्षांनंतर कमबॅक करत शाहरुखने आपली जादू कायम आहे हे दाखवून दिले. दरम्यान शाहरुखचे चाहते त्याला भेटण्यासाठी इतके आतुर झाले की थेट 'मन्नत' (Mannat) मध्येच घुसले. काय घडलं नेमकं ?काल २ मार्च रोजी मध्यरात्री शाहरुखच्या बांद्रा येथील 'मन्नत' निवासस्थानी दोन अज्ञात व्यक्ती भिंतीवरुन चढून घुसले. वेळीच सुरक्षारक्षकांनी बघितले आणि दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर लक्षात आले की दोघेही गुजरात वरुन आले आहेत आणि शाहरुखचे मोठे चाहते आहेत. दोघांचे वय १९-२० वर्षे असे आहे. ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षकांची या तरुणांवर नजर पडली आणि त्यांनी दोघांना पकडले. त्यांना शाहरुखला भेटण्याची इच्छा होती म्हणून ते थेट 'मन्नत'मध्ये घुसले असं त्यांनी सांगितलं. नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. 

शाहरुख खान सध्या 'जवान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काल रात्री ही घटना घडली तेव्हा तो मुंबईत होता का हे स्पष्ट झालेले नाही. हे तरुण घरात घुसतील तोच सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले. त्यामुळे शाहरुखच्या कुटुंबियांना कोणताही धोका निर्माण झाला नाही.

टॅग्स :शाहरुख खानमुंबईपोलिस