Join us

शाहरुखचा 'बाजीगर' अन् अक्षयचा 'खिलाडी' रिलीज! रेट्रो सिनेमांचा पुन्हा घ्या अनुभव, कधी? कुठे? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 17:56 IST

शाहरुख आणि अक्षयचे क्लासिक सिनेमे पाहण्याची संधी प्रेक्षकांना पुन्हा मिळणार आहे

शाहरुख खान, अक्षय कुमार, सैफ अली खान, सुनील शेट्टींच्या सिनेमांनी एक काळ गाजवलाय हे आपल्या सर्वांना माहितच आहे. आजही हे अभिनेते एकामागून एक सुपरहिट सिनेमे देत असले तरीही त्यांच्या क्लासिक सिनेमांनी बॉलिवूड गाजवलंय. अक्षय - शाहरुखच्या या गाजलेल्या क्लासिक सिनेमांचा पुन्हा अनुभव सर्वांना घेता येईल. रेट्रो सिनेमा फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे.

मुंंबईत क्लासिक रेट्रो सिनेमांच्या फेस्टिव्हलला सुरुवात झालीय. यामध्ये शाहरुख खानचा 'बाजीगर', अक्षय कुमारचा 'खिलाडी' तसेच 'में खिलाडी तू अनाडी' असे क्लासिक सिनेमे बघायला मिळणार आहेत. याशिवाय CINEPOLIS25 हा कोड टाकल्यास या सिनेमांच्या तिकीटावर २५ टक्के सवलत मिळेल. हे सिनेमा फेस्टिव्हल भारतातील निवडक सिनेपोलीस थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे.

शाहरुख आणि अक्षयच्या सध्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, शाहरुख सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नसून त्याने नुकतंच लेक आर्यन खानच्या जाहीरातीत काम केलंय. तर अक्षय लवकरच टायगर श्रॉफच्या आगामी 'बडे मिया छोटे मिया' सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा एप्रिलमध्ये ईदच्या मुहुर्तावर रिलीज होतोय. 

टॅग्स :शाहरुख खानअक्षय कुमार