Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:13 IST

बॉलिवूडलाच 'क्रूर' ठरवलं, नक्की काय घडलं?

शाहिद कपूर (Shahid Kapoor) बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता आहे. गेल्या वर्षीच शाहिद कपूरछत्रपती शिवाजी महाराज सिनेमात महाराजांची भूमिका साकारणार अशी घोषणा झाली होती. 'ओएमजी २'चे दिग्दर्शक अमित राय (Amit Rai) यांनीच तसं जाहीर केलं होतं. आता वर्षभरानंतर अमित राय यांनी त्या सिनेमावर भाष्य केलं आहे. हा सिनेमा डबाबंद झाला असल्याचा त्यांनी खुलासा केला आहे. यासाठी त्यांनी बॉलिवूडलाच 'क्रूर' ठरवलं आहे. 

'मिड डे'शी बोलताना अमित राय म्हणाले, " आपली सिस्टीम खूप क्रूर आहे. भले मी १८० कोटींचा OMG 2 सारखा सिनेमा करुन स्वत:ला सिद्ध केलं असेल तरी हे पुरेसं नाही. कास्टिंग, प्रोडक्शन, स्टार आणि मॅनेजमेंटच्या या सिस्टीममध्ये दिग्दर्शकाने कसं काम करावं? पाच वर्ष तुमच्याकडे एक गोष्ट आहे आणि काही मिनिटात दुसराच व्यक्ती पाच पानांवर सिनेमात काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे लिहितो."

"मला या अनुभवातून शिकवण मिळाली. म्हणूनच मी माझ्या पुढच्या सिनेमाची स्वत:च निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्या सिनेमात पंकज त्रिपाठींचीही भूमिका होती. तसंच अक्षय कुमारनेही त्यांना सिनेमासाठी माझा विचार का नाही केला असा प्रश्न विचारला होता. अभिनेता बॉक्सऑफिवर काय चालतंय तसाच सिनेमा निवडणार हे स्वाभाविक आहे. असे खूप कमी कलाकार आहेत जे माझ्यासोबत प्रामाणिक होते. काही वेळेला त्यांना समाजाला आरसा दाखवणाऱ्या सिनेमात रस नव्हता तर त्यांना लव्हस्टोरी करायची होती. जेव्हा मी त्यांच्याकडे लव्हस्टोरी घेऊन गेलो तेव्हा ते म्हणाले,'हा फारच खर्चिक सिनेमा आहे आणि ऐतिहासिक प्रेम कथा आहे.' त्यामुळे त्यांचा क्रायटेरिया कायमच बदलत राहतो. खरं तर तुम्ही त्यांच्या सर्कलमध्ये एकदा का गेलात की मगच ते तुमच्या सिनेमाला होकार देतात."

शाहिद कपूरचा 'देवा' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. याशिवाय नंतर तो आगामी अॅक्शन थ्रिलर 'अर्जुन उस्तारा' सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूडछत्रपती शिवाजी महाराज