Join us

शानदार! शाहिद कपूरने खरेदी केली ब्रँड न्यू लक्झरी मर्सिडीज कार, किंमत वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:44 IST

Shahid Kapoor Buy Brand New Luxurious Mercedes : शाहिद कपूरने नुकताच त्याचा 41 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं आणि तिसऱ्याच दिवशी शाहिदच्या कारच्या ताफ्यात एक नवीकोरी महागडी अलिशान गाडी उभी झाली.

Shahid Kapoor Buy Brand New Luxurious Mercedes : शाहिद कपूरने (Shahid Kapoor) नुकताच त्याचा 41 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं आणि तिसऱ्याच दिवशी शाहिदच्या कारच्या ताफ्यात एक नवीकोरी महागडी अलिशान गाडी उभी झाली. होय, शाहिद कपूरने नुकतीच मर्सिडीज खरेदी केली. याची किंमत ऐकून तुमचेही डोळे पांढरे होती.सोशल मीडियावर शाहिद व त्याची पत्नी मीराचा कारची डिलिव्हरी घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. शाहिद व मीरा त्यांच्या जुन्या गाडीतून उतरतात आणि नव्या ब्रँड न्यू Mercedes Maybach S-Classची डिलिव्हरी घ्यायला जाताना यात दिसत आहेत.

या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ‘कबीर सिंग’चे पैसे गुंतवले, असं एका युजरने लिहिलं आहे. एका युजरने ब्युटिफुल कार असं म्हटलं आहे.

इतकी आहे किंमतशाहिद कपूरच्या या ब्रँड न्यू Mercedes Maybach S-Class कारची मार्केट प्राईज 2.77 कोटी रूपये आहे. रॉयल व विंटेज लूक हे या गाडीचं वैशिष्ट्य आहे. या गाडीची एक्स-शोरूम प्राईज 2.11 ते 2.79 कोटीच्या घरात आहे.

शाहिदचं कार कलेक्शनशाहिद कपूर महागड्या व अलिशान गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे आधीच अनेक अलिशान गाड्या आहेत. 1.30 कोटींची मर्सिडीज बेंज एमजी एस 400, 1.58 कोटींची पोर्शे कॅनिन, 1.37 कोटींची जगुआर एक्सकेआर, 1.80 कोटीची रेंज रोव्हर वोग अशा गाड्या त्याच्याकडे आहेत. मर्सिडीज जीएलएस 350 डी ही गाडीही त्याच्याकडे आहे. याची किंमत 93.25 लाख रूपये आहे. याशिवाय 77 लाखांची मर्सिडीज जीएलसी 300  या गाडीचाही तो मालक आहे.

टॅग्स :शाहिद कपूरमीरा राजपूतबॉलिवूड