Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त पैशांसाठी शाहरुखने केला होता एक सिनेमा; पैसे हातात येताच खरेदी केलं होतं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:50 IST

एकेकाळी शाहरुख खानने एक सिनेमा फक्त पैशांसाठी केला होता.

अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. किंग खानच्या 'पठाण' आणि 'जवान' या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडलेत. आज शाहरुख खान कोटींमध्ये कमावतो, तो प्रत्येक चित्रपटासाठी करोडो रुपये घेतो.  पण तुम्हाला माहित आहे का यशाच्या शिखरावर पोहण्यासाठी किंग खानने खूप मेहनत घेतली. एकेकाळी शाहरुख खानने एक सिनेमा फक्त पैशांसाठी केला होता. एका टॉक शोमध्ये त्याने याचा खुलासा केला. मात्र त्याने चित्रपटाचे नाव सांगितले नाही.

 खरंतर शाहरुखला एक घर घ्यायचं होते. ज्यासाठी त्याला खूप पैशांची गरज होती. त्यामुळे इच्छा नसतानाही त्यांनी तो चित्रपट केवळ पैशासाठी केला होता. शिवाय, जेव्हा शाहरुख आर्थिकरित्या सक्षम झाला. तेव्हा त्याने संबंधित सिनेमाचे पैसे परत केले होते.  शाहरुख म्हणाला होता, 'मला तो चित्रपट करावासा वाटला नव्हता. पण, पैशांची गरज होती. मी माझा विवेक विकून पैशासाठी फक्त एकच चित्रपट केला आहे. पण, नंतर तो सिनेमाचेही पैसे मी परत केले'.

केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सपैकी एक शाहरुख आहे. प्रचंड मेहनत करुन त्याने हे यश मिळवलं आहे. शाहरुखच्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून झाली होती. मालिकांमध्ये भूमिका साकारणारा कलाकार आज बॉलिवूडवर राज्य करतोय.   

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर,  किंग खान शाहरुखसाठी 2023 वर्ष हे खूप खास ठरलं. वर्षाच्या सुरुवातीला 'पठाण' आणि त्यानंतर 'जवान' सिनेमाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. आता त्याचा तिसरा चित्रपट 'डंकी' देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. एकाच वर्षात किंग खानचा तिसरा चित्रपट पाहायला मिळणार असल्याने चाहते खूप उत्साहित आहेत.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडसेलिब्रिटी