Join us
Daily Top 2Weekly Top 5

“पत्नी म्हणते मला शाहरुखला बघायचं नाही”, चाहत्याच्या प्रश्नावर ‘जवान’चं भन्नाट उत्तर, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 17:11 IST

शाहरुखने नुकतंच ट्विटरवर #asksrk सेशन घेतलं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शाहरुखने अगदी खुमासदार शैलीत उत्तरं दिली आहेत.

बॉलिवूडचा किंग खान ‘पठाण’ चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. शाहरुख खान ‘जवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ‘जवान’चा ट्रेलरपाहून प्रेक्षकांची उस्तुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटातील गाणीही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. शाहरुखने त्याच्या चाहत्यांसाठी नुकतंच ट्विटरवर #asksrk सेशन घेतलं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शाहरुखने अगदी खुमासदार शैलीत उत्तरं दिली आहेत.

एका चाहत्याने शाहरुखला “मी होणाऱ्या पत्नीला जवान बघायला जाऊ, असं म्हणालो. त्यावर ती मला माझा जवान तर तू आहेस. मला शाहरुखला बघायचं नाही,असं म्हणाली,” असं विचारलं. यावर गमतीशीर पद्धतीने किंग खानने रिप्लाय दिला आहे. शाहरुख म्हणाला, “ठीक आहे, तू तिचंच ऐक. कोणा दुसऱ्याकडून चित्रपटाबद्दल जाणून घे. तिला विचार पुढचा चित्रपट बघणार का? चित्रपटाचं नाव डंकी आहे. की तू डंकीही मारतोस.”

राहुल गांधी फ्लाइंग किस वाद: प्रकाश राज यांनी स्मृती इराणींनाच सुनावलं, म्हणाले, "मॅडमजी..."

“मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटलं तर...”, हेमांगी कवीच्या पोस्टने वेधलं लक्ष

शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. शाहरुखच्या जवानमध्ये मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोलेदेखील महतत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अटली कुमारने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूड