Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन् 16 वर्षांनंतर मिटला सनी देओल-शाहरूख खानचा अबोला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 08:00 IST

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘डर’ या  चित्रपटादरम्यान सनी देओल व शाहरुख यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर गत १६ वर्षे सनी शाहरुखशी बोलत नव्हता.

ठळक मुद्देमाझी भूमिका कापून शाहरूखला मोठे केले,असा आरोप सनीने केला होता. पण यश चोप्रा कधीच यावर बोलले नाहीत.

अभिनेता सनी देओल लवकर दिग्दर्शक म्हणून एक नवी इनिंग सुरु करतोय. सनी देओल दिग्दर्शित ‘पल पल दिल के पास’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. सनीचा मुलगा करण देओल या चित्रपटातूनडेब्यू करतोय. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आणि बॉलिवूडने सनी आणि करण दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला. पण शुभेच्छा देणा-या कलाकारांच्या यादीतील एक नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. होय, हे नाव म्हणजे किंगखान शाहरूख खान. 

शाहरूखने सनी व करण दोघांनाही शुभेच्छा देत, ‘पल पल दिल के पास’च्या टीजरचे कौतुक केले. त्याच्या या शुभेच्छांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. याचे कारण म्हणजे गत 16 वर्षांपासून सनी आणि शाहरूख यांच्यातील वाद.

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘डर’ या  चित्रपटादरम्यान सनी देओल व शाहरुख यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर गत १६ वर्षे सनी शाहरुखशी बोलत नव्हता. मात्र अलीकडे सनीने संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले होते.

तो म्हणाला होता की, सिनेमात मी कमांडोच्या भूमिकेत होतो आणि शाहरुखला मला चाकू मारताना दिसणार होता. मी कमांडो असताना एक किरकोळ देहयष्टीचा तरूण मला चाकू मारतो, हे मला पटत नव्हत. याच गोष्टीचा मला राग होता. यशजी फार मोठे होते. मी त्यांना काही बोलू शकत नव्हतो. पण मला प्रचंड राग आला होता. मी स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पँटच्या खिशात हात ठेवून मी उभा होतो आणि रागाच्या भरात मी कधी पँटचा खिसा हाताने कुरतडला हेही मला कळले नाही.या वादानंतर यश चोप्रांनी एका खलनायकाला अतोनात महत्त्व दिले. माझी भूमिका कापून शाहरूखला मोठे केले,असा आरोपही सनीने केला होता. पण यश चोप्रा कधीच यावर बोलले नाहीत. आता मात्र शाहरूखने पुढाकार घेतला आहे. सनीला शुभेच्छा देत, त्याने एकप्रकारे मैत्रीचा हात पुढे केला आहे. सनी त्याला कसे उत्तर देतो, ते बघूच.

टॅग्स :सनी देओलशाहरुख खान