Join us

अमेरिकेच्या वृत्तपत्रातील शब्दकोड्यात शाहरूख खानसंबंधीचा प्रश्न, फॅन्सने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 18:59 IST

Shahrukh Khan : शाहरूख किती लोकप्रिय आहे याचा अंदाजवरून घेता येऊ शकतो की, अमेरिकेतील एका वृत्तपत्रातील शब्दकोड्यात त्याच्यासंबंधी प्रश्न आहे.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानची (Shahrukh Khan) फॅन फॉलोईंग केवळ देशातच नाही तर जगभरात आहे. भलेही गेल्या दोन वर्षात त्याचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. तरीही त्याची लोकप्रियता जराही कमी झाली नाही. शाहरूख खान जगभरात लोकप्रिय आहे. तो सध्या त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरूख किती लोकप्रिय आहे याचा अंदाजवरून घेता येऊ शकतो की, अमेरिकेतील एका वृत्तपत्रातील शब्दकोड्यात त्याच्यासंबंधी प्रश्न आहे. एका सोशल मीडिया यूजरने त्याचा फोटो शेअर केला आहे. 

एका ट्विटर यूजरने वृत्तपत्रातील शब्दकोड्याचा फोटो शेअर केला आहे. फोटोत शाहरूखसंबंधी प्रश्नही दिसत आहे. प्रश्न आहे की, व्हर्सटाइल अवॉर्ड विनिंग इंडियन फिल्म स्टार ज्याला लोक SRK नावाने ओळखतात. शब्दकोड्यात बरोबर उत्तर शाहरूख खान लिहिलंही आहे. हा फोटो पेज विलसन नावाच्या यूजरने शाहरूख खानला टॅग करत शेअर केला. सोबतच शाहरूखचं कौतुकही केलं.

यूजरने लिहिलं की, 'हाय शाहरूख @iamsrk माझी बहीण पॅमने मला हा फोटो पाठवल आणि मला सांगितलं की, तुम्ही कालच्या यूएसच्या लॉस एंजेलिस टाइम्सच्या शब्दकोड्यातील भाग होता. खूप प्रेम'. शाहरूखचा सन्मान जगभरात होतो. आजही तो आशियातील सर्वात पॉप्युलर स्टार आहे. शाहरूखने त्याच्या अनेक सिनेमांचं शूटिंग फॉरेनमध्ये केलं आहे. तो नुकताच स्पेनहून पठाणचं शूटिंग करून परतला.

शाहरूख खान तब्बल ४ वर्षांनंतर स्क्रीनवर दिसणार आहे. त्याच्या या सिनेमाकडून फॅन्सना आणि त्याला स्वत:लाही खूप अपेक्षा आहेत. शाहरूखच्या करिअरच्या हिशोबाने हा सिनेमा महत्वाचा ठरणार आहे. या सिनेमातील त्याला लूकही समोर आला होता. त्याचा शेवटचा सिनेमा झीरो होता. 

टॅग्स :शाहरुख खानअमेरिकाबॉलिवूड