कलाविश्वात आतापर्यंत अशा अनेक सिनेमांची निर्मिती झाली आहे ज्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. यात मदर इंडिया, मुगले आझम, शोले अशा कितीतरी सिनेमांची नाव आहेत. याच सिनेमांच्या यादीत सध्या एका नव्या सिनेमाचं नाव घेतलं जातंय. तो सिनेमा म्हणजे आदित्य धर यांचा धुरंधर (Dhurandhar). या सिनेमाची दोन्ही पार्ट सुपरहिट ठरले. त्यामुळे या सिनेमासोबतच अभिनेता रणवीर सिंहची (ranveer singh) लोकप्रियताही जबरदस्त वाढली. कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी या सिनेमाचं आणि रणवीरचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने या सिनेमाविषयी एकही उद्गार न काढल्यामुळे कलाविश्वात एक नवीनच चर्चा सुरु झाली होती. मात्र, या चर्चांना किंग खानने पूर्णविराम दिला आहे.
धुरंधर आणि रणवीर सिंहच्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक झालं. अगदी टॉलिवूडच्या कलाकारांनीही त्याचं कौतुक केलं. मात्र, बॉलिवूडकडून रणवीरला म्हणावं तसं प्रेम मिळालं नाही. यात अलिकडेच शाहरुखने अल्लू अर्जुनच्या राका या सिनेमाचं कौतुक केलं. मात्र, धुरंधरविषयी त्याने जराही भाष्य केलं नाही. त्याचं हे वर्तन पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलं ट्रोल केलं. मात्र, या ट्रोलिंगमध्येच शाहरुखचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये त्याचं रणवीरविषयीचं प्रेम, मैत्री दिसून आली.
अलिकडेच अनंत अंबानीचं बर्थ डे सेलिब्रेशन झालं. या कार्यक्रमात इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते. यात रणवीर आणि शाहरुख खानदेखील दिसून आले. याच बर्थ डे पार्टीतला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये शाहरुख खानने रणवीरच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला आणि त्याचे गालगुच्चे घेतले. विशेष म्हणजे या व्हिडीओमधून या दोघांचं असलेलं स्पेशल बॉण्डिंग दिसून आली. इतकंच नाही तर शाहरुखच्या मॅनेजरनेदेखील रणवीरचं अभिनंदन केलं.
दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींच्या मते, शाहरुखला पाहून रणवीरने त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. तर, काहींनी या दोघांची मैत्री कायम आहे,असं म्हटलं आहे.
Web Summary : Amidst silence on 'Dhurandhar', Shah Rukh Khan's affectionate interaction with Ranveer Singh at Anant Ambani's birthday went viral, showcasing their bond and ending speculation about any rift between the actors.
Web Summary : 'धुरंधर' पर चुप्पी के बीच, अनंत अंबानी के जन्मदिन पर शाहरुख खान और रणवीर सिंह की मुलाकात का वीडियो वायरल हुआ, जिसने अटकलों को समाप्त करते हुए उनके बंधन को दर्शाया।