Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानने ३१ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत केला रोमांस, पहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 19:30 IST

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ३१ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत शाहरूख रोमांस करताना दिसतो आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ३१ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत शाहरूख रोमांस करताना दिसतो आहे. ही अभिनेत्री म्हणजे धडक फेम जान्हवी कपूर. या व्हिडिओत आलिया भटदेखीलरणबीर कपूरकडे आपले प्रेम व्यक्त करताना दिसते आहे. 

शाहरूख खानला रोमांस किंग संबोधले जाते. त्याच्यासोबत रोमांस करणे कोणत्याही अभिनेत्रीसाठी स्वप्नासारखेच आहे. नुकतीच ही संधी अभिनेत्री जान्हवी कपूरला मिळाली. नुकताच पार पडलेल्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात शाहरूख जान्हवीसोबत रोमांस करताना दिसतो आहे. त्या दोघांच्या वयात ३१ वर्षांचे अंतर आहे. जान्हवीचे वय २२ आहे तर शाहरूख ५३ वर्षांचा आहे. या पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात बॉलिवूडचे तारेतारका दिसत आहेत. या व्हिडिओत जान्हवी आणि शाहरूख खान देखील दिसतो आहे. या व्हिडिओत जान्हवी स्टेजवर पुरस्कार घ्यायला गेली आणि त्यावेळी तिने शाहरूखला तिचे त्याच्यासोबत रोमांस करण्याचे स्वप्न सांगितले आणि शाहरूखने पूर्णदेखील केले.

शाहरूख जान्हवी व्यतिरिक्त या व्हिडिओत अभिनेत्री दीपिका पादुकोण, रणवीर सिंग दिसत आहे. तर आलिया भटदेखीलरणबीर कपूरकडे प्रेम व्यक्त करताना दिसते आहे. हा पुरस्कार सोहळा लवकरच कलर्स वाहिनीवर प्रसारीत केला जाणार आहे.

यंदाच्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात आलिया भटला राझी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर संजूसाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

राझी चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर क्रिटिक्स अवॉर्ड बेस्ट अॅक्टर फिमेल नीना गुप्ता यांना बधाई हो चित्रपटासाठी मिळाला आणि क्रिटिक्स अवॉर्ड बेस्ट अॅक्टर मेल रणवीर सिंगला पद्मावतला मिळाला.

टॅग्स :शाहरुख खानजान्हवी कपूरदीपिका पादुकोणरणवीर सिंगआलिया भटरणबीर कपूर