Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shah Rukh Khan : ‘पठाण’ची रिलीज डेट पुढे ढकलणार...? शाहरूखने चाहत्याला असं काही दिलं उत्तर की भलतीच रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 10:41 IST

Shah Rukh Khan : 15 मिनिटांच्या  #AskSRK या सेशनमध्ये एसआरके चाहत्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलला. यातले काही प्रश्न मजेशीर होते आणि शाहरूखने त्यावर भन्नाट उत्तरं दिली.

शाहरूख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या ‘पठाण’  (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीज होण्याआधीच या सिनेमानं मोठा वाद ओढवून घेतला आहे. अगदी सोशल मीडियावर सिनेमा बायकॉट करण्याची मोहिम सुरू झाली आहे. याची सुरूवात झाली 12 डिसेंबरला. होय, या तारखेला ‘पठाण’चं पहिलं गाणं रिलीज झालं. ‘बेशरम रंग’ असे बोल असलेल्या या गाण्यात दीपिका भगव्या बिकिनीत दिसली आणि यावरून वाद सुरू झाला. अद्याप शाहरूख वा दीपिकाने या वादावर उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र काल शाहरूखने ट्विटरवर लाईव्ह येत चाहत्यांच्या प्रश्नांना बिनधास्त उत्तरं दिली.

15 मिनिटांच्या  #AskSRK या सेशनमध्ये एसआरके चाहत्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलला. यातले काही प्रश्न मजेशीर होते आणि शाहरूखने त्यावर भन्नाट उत्तरं दिली.

चाहत्याचा प्रश्न - सर,25 जानेवारीला माझं लग्न आहे, तुम्ही ‘पठाण’ला 26 जानेवारीपर्यंत पोस्टपोन करू शकता का?शाहरूख- तू 26 ला (रिपब्लिक डे परेडनंतर) लग्न कर. सुट्टीही आहे त्यादिवशी..

चाहत्याचा प्रश्न - #AskSRK हे फक्त 15 मिनिटांचंच का असतं?शाहरूख - कारण प्रत्येकाला फेमसाठी फक्त 15 मिनिटांचीच गरज असते.

चाहत्याचा प्रश्न - तुझ्यासाठी जग म्हणजे काय?शाहरूख- माझी मुलं

चाहत्याचा प्रश्न - तुझ्या कुटुंबात सगळ्यात नॉटी कोण आहे?शाहरूख - कदाचित मी आहे.

चाहत्याचा प्रश्न - (जो नंतर डिलीट करण्यात आला)शाहरूख - आधी जिंदगी निकल गई भाई अच्छा काम करके कमाने में... तू पण तुझ्या आयुष्यात असं काही मिळवावं यासाठी शुभेच्छा...

चाहत्याचा प्रश्न - जॉनसोबत काम करून कसं वाटलं?शाहरूख- जॉन खूपच प्रेमळ आणि दयाळू आहे. अ‍ॅक्शन सीन करताना मला इजा होऊ नये, याची त्याने पूरेपूर काळजी घेतली. ब-याच वर्षांपासून त्याला ओळखतो.

चाहत्याचा प्रश्न - पठाण हा सिनेमा का पाहावा?शाहरूख - मला वाटतं पाहताना मज्जा येईल, म्हणून पाहावा.

चाहत्याचा प्रश्न  - ती पेटीवाली खुर्ची कितीला मिळेल सर?शाहरूख - पेटीवाली मिळाली नाही तर आपल्या पायजाम्याचा नाडा टाईट कर...

चाहत्याचा प्रश्न  - खान साहब, ब्रेकअप झालं, प्लीज एक जादू की झप्पी द्या...शाहरूख - जिच्यासोबत ब्रेकअप झालं, तिलाच दे...चांगलं होईल...

चाहत्याचा प्रश्न  - शिक्षण पूर्ण झालं की मुंबईला येतेय, तुझंं मन्नत बघण्यासाठी...शाहरूख- आशा करतो तुला आमच्या घराची पाटी आवडेल, जी गौरीनं डिझाईन केलीये. 

टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमाबॉलिवूड