Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डंकी'वरून चाहत्याचा 'चावट' प्रश्न! शाहरुख खानचे मजेशीर उत्तर, म्हणाला, "वडिलांकडून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 17:48 IST

शाहरुखने ट्वीटरवर asksrk सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला शाहरुखने त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. 

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या आगामी 'डंकी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरनंतर डंकीबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. शाहरुखने 'डंकी'चं प्रमोशनही सुरू केलं आहे. नुकतंच त्याने ट्वीटरवर asksrk सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शाहरुखने त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. 

एका चाहत्याने शाहरुखला चावट प्रश्न विचारला आहे. त्याच्या या प्रश्नाला शाहरुखने त्याच्या शैलीत अगदी मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं आहे. "डंकीमध्ये *** तर नाहीये ना?  वडिलांबरोबर चित्रपट पाहू शकतो का?" असं एका चाहत्याने asksrk सेशनमध्ये शाहरुखला विचारलं होतं. चाहत्याच्या या प्रश्नाला शाहरुखने उत्तर देत "*** तर समजलं नाही मला...पण, तिकिटांवर टॅक्स नक्कीच लागेल. वडिलांकडून घे," असं म्हटलं आहे. त्याचं हे ट्वीट व्हायरल झालं आहे. 

शाहरुखचा 'डंकी' सिनेमा २१ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिराणींनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखबरोबर या सिनेमात विकी कौशल, तापसी पन्नू, सतिश शाह, बोमन इराणी या कलाकारांची फौज आहे. 

टॅग्स :शाहरुख खानसिनेमासेलिब्रिटी