Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्यामुळे जया बच्चन मारणार होत्या शाहरूख खानच्या कानशीलात, जाणून घ्या यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 12:05 IST

ऐश्वर्यावर केलेल्या या कमेंटमुळे जया बच्चन शाहरूखवर खूप भडकल्या होत्या.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आज वाढदिवस आहे. शाहरूखला बॉलिवूडमधील रोमांसचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. शाहरुखाला रोमांसचा बादशाह म्हणूनही ओळखलं जातं. शाहरुखला बॉलिवूडमध्ये खूप मान आहे. सर्व त्याच्याशी खूप आदराने वागतात. मात्र काही वर्षांपूर्वी शाहरूखचं वागणं पाहून सर्वांना धक्का बसला होता. इतकंच नाही तर अभिनेत्री जया बच्चन यांनी तर चिडून शाहरुखच्या कानाखाली मारावसं वाटतं असंही म्हटलं होतं.

शाहरुख खाननं बच्चन कुटुंबाची सून व अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे आणि हे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. ज्यात ‘जोश’, ‘मोहब्बतें’, ‘देवदास’ सारख्या सिनेमांचा समावेश आहे. त्यावेळी सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा होता. त्यादरम्यान ऐश्वर्या शाहरुख सोबत काम करत होती हे सलमानला आवडलं नाही आणि त्यानं सेटवर जाऊन शाहरुखला खूप सुनावलं. यामुळे ऐश्वर्यानं तर हा सिनेमा सोडलाच पण शाहरुखनं सुद्धा रागाच्या भरात ऐश्वर्यावर वाईट शब्दात कमेंट केल्या होत्या. शाहरुख-सलमानचा हा वाद त्यावेळी बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजला होता. जेव्हा ही गोष्ट जया बच्चन यांना समजली तेव्हा त्यांनी मला शाहरुखच्या कानाखाली मारावसं वाटतं असं म्हटलं होतं.

जया बच्चन म्हणाल्या, हो मी खरोखरंच त्याच्या कानाखाली मारेन. खरं तर अजून पर्यंत त्याची माझी भेट झाली नाही पण जेव्हाही मी त्याला भेटेन तेव्हा त्याला या वादाबद्दल विचारणार आहे. मी त्याला तसंच कानाखाली मारेन जसं मी माझ्या मुलाला मारते. माझं आणि शाहरुखचं नातं अगदी आई-मुलासारखं आहे.

शाहरुख खाननं अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत कभी खुशी कभी गम या सिनेमात काम केलं होतं. त्यावेळी त्यानं अमिताभ-जया यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकरली होती. पण रिअल लाइफमध्येही शाहरुखचं त्यांच्याशी नातं तसंच आहे.

टॅग्स :शाहरुख खानजया बच्चनऐश्वर्या राय बच्चनसलमान खान