Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pathaan : सरप्राईज अन् सॉरी...! ‘पठाण’च्या रिलीजआधी शाहरूख खानने का मागितली माफी...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:31 IST

Shah Rukh Khan, Pathaan : काल रविवारी रात्री उशीरा शाहरूखने ‘मन्नत’ बाहेर जमलेल्या फॅन्सला सुपर सरप्राईज दिलं. पण सोबत माफीही मागितली...

शाहरुख खानच्या ( Shah Rukh Khan) ‘पठाण’ची (Pathaan ) जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. येत्या बुधवारी हा सिनेमा रिलीज होतोय आणि किंगखानच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इतकी की ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची गर्दी होत आहे. चाहत्यांचं हे प्रेम पाहून शाहरूख भारावून गेला आहे. या प्रेमाची उतराई तर व्हायलाच हवी. काल रविवारी रात्री उशीरा शाहरूखने ‘मन्नत’ बाहेर जमलेल्या फॅन्सला सुपर सरप्राईज दिलं.

ऐरवी शाहरूख केवळ त्याच्या वाढदिवशी आणि ईदच्या दिवशीच बाल्कनीत येत चाहत्यांना दर्शन देतो. पण कालचा दिवस वेगळा होता. काल ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांनी गर्दी केली असताना अचानक शाहरूख बाल्कनीत प्रगटला. शेकडो चाहते  ‘पठाण’ चित्रपटासाठी शाहरूखला शुभेच्छा देण्यासाठी ‘मन्नत’ बाहेर जमले होते. या चाहत्यांच्या प्रेमाखातर शाहरुखही बाल्कनीत आला.  चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्याने सर्वांचे आभारही मानले. हात जोडून त्याने सर्वांना अभिवादन केलं. शिवाय त्याची आयकॉनिक पोझही क्रिएट केली.

 माफीही मागितली...चाहत्यांच्या प्रेमाने भारावलेल्या शाहरूखने एक व्हिडीओ  सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात चाहते त्याच्या घरासमोर जमून टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात शाहरूख...शाहरूख...च्या घोषणा देत आहेत. शाहरूख चाहत्यांचं हे प्रेम पाहून भारावला खरा, पण सोबत त्याने माफीही मागितली. घराबाहेर जमलेल्या चाहत्यांमुळे वाहतूक कोंडी झाली. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं, “या सुंदर रविवार संध्याकाळबद्दल तुमचे मनापासून आभार. मला माफ करा. पण मला आशा आहे की, त्या लाल गाडीत बसलेल्यांनी सीट बेल्ट लावला होता. ‘पठाण’ची तिकिटं बुक करा. पुढच्या वेळी मी तुम्हाला तिथेच भेटेन.”

 शाहरुख आणि दीपिका यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे.  

टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमाबॉलिवूड