Join us
Daily Top 2Weekly Top 5

K3Gमधील शाहरुख-काजोलचे रोमँटिक सीन्स केले होते डिलीट; आता २३ वर्षांनी व्हायरल होतोय व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 09:33 IST

'कभी खुशी कभी गम'मधील शाहरुख-काजोलच्या डिलीट केलेल्या सीन्सचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि काजोल ही ९०च्या दशकातील ऑनस्क्रीन हिट जोडी होती. 'कभी खुशी कभी गम', 'कुछ कुछ होता है', 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे', 'करण अर्जुन' अशा अनेक सुपरहिट सिनेमांत काजोल-शाहरुख एकत्र दिसले. २००१ साली प्रदर्शित झालेल्या 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील शाहरुख-काजोलच्या लव्ह स्टोरीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा सिनेमा आणि त्यातील गाणीही तितकीच लोकप्रिय आहेत. पण, या सिनेमातील काजोल आणि शाहरुखचे काही सीन्स डिलीट करण्यात आले होते. 

करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील शाहरुख-काजोलच्या रोमँटिक सीन्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शाहरुख आणि काजोलचा एक मोंटाज दाखविण्यात आला आहे. यामध्ये काजोल आणि शाहरुखचे अनेक रोमँटिक सीन्सही दाखविण्यात आले आहेत. पण, कभी खुशी कभी गममधून हा मोंटाज डिलीट केल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

'कभी खुशी कभी गम'मधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत एका ट्वीटर युजने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, 'कभी खुशी कभी गम' या सिनेमात काजोल-शाहरुखबरोबर अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन, करीना कपूर या कलाकरांच्या मुख्य भूमिका होत्या. एक परिपूर्ण कौटुंबिक स्टोरी असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. आजही हा सिनेमा तितकाच लोकप्रिय आहे. 

टॅग्स :शाहरुख खानकाजोलकरण जोहर