Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बेशरम रंग'नंतर शाहरुख-दीपिकाचा पुन्हा रोमान्स, 'किंग'मधील गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:20 IST

'किंग' सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शाहरुख आणि दीपिका रोमान्स करताना दिसत आहेत.

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण 'किंग' सिनेमामुळे सध्या चर्चेत आहेत. प्रेग्नंट असतानाही दीपिका सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शाहरुख आणि दीपिका रोमान्स करताना दिसत आहेत. 'किंग' सिनेमाच्या शूटिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

'किंग' सिनेमाच्या शूटिंगसाठी शाहरुख आणि दीपिका सध्या केपटाऊनमध्ये आहेत. तेथीलच एका बीचवर सिनेमातील रोमँटिक गाण्याचं शूटिंग झालं. ज्यामध्ये पुन्हा एकदा शाहरुख आणि दीपिका रोमान्स करताना दिसणार आहेत. या व्हिडीओत समुद्रकिनारी ते दोघे पोझ देताना दिसत आहेत. दोन-तीन वेळा ते गाण्याची सेमच स्टेप करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 'किंग' सिनेमातील गाण्याच्या या शूटिंगचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना 'बेशरम रंग'ची आठवण झाली आहे. याआधी पठाण सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यात दीपिका-शाहरुखची केमिस्ट्री पाहायला मिळाला होता. ज्याची खूप चर्चाही झाली होती. 

'किंग' सिनेमाच्या सेटवरील शाहरुखचे सीन शूट करतानाचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. शाहरुख-दीपिकाचा 'किंग' हा सिनेमा २०२६च्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ डिसेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Shah Rukh and Deepika's Romance Resurfaces in 'King'; Video Viral

Web Summary : Shah Rukh Khan and Deepika Padukone are filming 'King' in Cape Town. A video shows them romancing by the beach, reminiscent of 'Besharam Rang'. The film releases December 2026.
टॅग्स :शाहरुख खानदीपिका पादुकोण