Join us

Dear NCB, ती परत आलीये...! कंगनाचा जुना व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेस नेत्याने केली ही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 11:37 IST

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत दाखल होताच, पुन्हा एकदा ती आणि महाविकास आघाडी यांच्यात ‘सामना’ रंगण्याची चिन्ह आहेत.

ठळक मुद्देकालपरवा कंगना मुंबईत दाखल झाली. मुंबईत दाखल होताच कंगनाने काय करावे तर, ती सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचली.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत दाखल होताच, पुन्हा एकदा ती आणि महाविकास आघाडी यांच्यात ‘सामना’ रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. कालच नुकत्याच शिवसेनेत आलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला जोरदार टोमणा मारला होता. आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत, एनसीबीने ड्रग्जप्रकरणी तिची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.काँग्रेस नेते सचिन सावंत  यांनी कंगनाचा एक जुना व्हिडीओ  ट्वीट केला आहे. आपण ड्रग्जच्या आहारी गेलो होतो, अशी कबूली  कंगना या व्हिडीओेत देत आहे. कंगनाचा हा व्हिडीओ पोस्ट करत, सावंत यांनी ट्वीट  केले आहे.

‘डिअर एनसीबी, ती परत आलीये. या व्हिडीओसंदर्भात तुम्ही तिला कधी चौकशीसाठी बोलवणार आहात? मोदी सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. कारण ती बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी माहिती देणार होती. मात्र, ती अजूनही माहिती लपवत आहे आणि तो मोठा गुन्हा आहे,’ असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी कंगना आणि राज्य सरकार यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दांत अतिशय बोचरी टीका केली होती.   मुंबईला  पाकव्याप्त काश्मीर म्हणणा-या कंगनाला त्यावेळी अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. हा रोष पाहता गेल्या वेळी कंगना मुंबईत आली होती.

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ?

कालपरवा कंगना मुंबईत दाखल झाली. मुंबईत दाखल होताच कंगनाने काय करावे तर, ती सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचली. इतकेच नाही तर मंदिराच्या बाहेर येताच, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला टोमणा मारला होता. ‘मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त बाप्पाची परवानगी तेवढी हवी. ती मिळाली आहे,’ असे ती म्हणाली होती. ‘माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे मला कितीतरी शत्रूंचा सामना करावा लागला. मी आज मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आता मला सुरक्षित वाटतेय,’ असेही ती म्हणाली होती.  तिच्या याच वक्तव्यावर अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी जोरदार टोला लगावला होता. ‘माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असे खोचक ट्वीट उर्मिला यांनी केले होते.  

VIDEO : कंगना रणौत पुन्हा मुंबईत दाखल, पण यावेळी दिसला एक फरक....

टॅग्स :कंगना राणौत