Join us

अपनों के खून से बढकर कुछ नहीं! काजोल-इब्राहिमच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:35 IST

बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) सध्या तिच्या 'मॉं' या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे.

Kajol Movie : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) सध्या तिच्या 'मॉं' या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. २७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात काजोलने केलेल्या अभिनयाचं सगळ्यांनीच कौतुक केलं. एकीकडे या चित्रपटाची चर्चा असताना काजोल लवकर नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाचं नाव सरजमीन आहे. अलिकडेच सरजमीन चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यानंतर टीझरही रिलीज करण्यात आला. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. हा उत्कंठावर्धक ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. 

देशभक्तीपर आधारित असलेल्या सरजमीन मध्ये काजोल, इब्राहिम अली खान आणि साऊथ सुपरस्टार पृथ्वीराजची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचा ट्रेलरमध्ये सुरुवातीला बर्फाच्छिदित प्रदेशात इब्राहिम दिसतो. त्याचदरम्यान, बॅकग्राउंडला "जानते हो कुछ घाव ऐसे होते हैं वो तब तक नहीं भरते, जब तक उनकी याद नहीं मिट जाती...", असे डायलॉग्ज कानावर पडतात. ट्रेलरमध्ये इब्राहिम अली खान वेगळाज अंदाज पाहायला मिळतो आहे. अॅक्शन, ड्रामा या सर्व गोष्टी ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे इब्राहिम या चित्रपटात  खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

दरम्यान, "यहॉं हर फैसला एक कहाणी है, देश की या अपनों की कुछ ऐसी ही सरजमीन की कहाणी है...!" असं कॅप्शन देत सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलरची झलक दाखवण्यात आली आहे. 'सरजमीन' या चित्रपटाचं दिग्दर्शन केओझे इरानी यांनी केलं आहे. येत्या २५ जुलैला हा देशभक्तीवर आधारित असलेला सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाणार आहे.

टॅग्स :काजोलइब्राहिम अली खानबॉलिवूडसिनेमा