Join us

कंगना रानौतच्या ह्या सिनेमातील गाण्याची कोरियोग्राफी करणार सरोज खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 08:00 IST

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रानौतचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'मणिकर्णिका' चित्रपटातील एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान करणार आहेत.

ठळक मुद्देकंगना रानौत करणार जिस्शू सेनगुप्तासोबत गाण्याचे चित्रीकरण 'मणिकर्णिका' चित्रपटातील रोमँटिक गाण्याची कोरियोग्राफी करणार सरोज खान

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रानौतचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'मणिकर्णिका' चित्रपटातील एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे क्लासिकल साँग असणार आहे. तर या सिनेमातील दुसऱ्या गाण्यात अंकिता लोखंडे दिसणार आहे.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार कंगना 'मणिकर्णिका' चित्रपटात तिच्या पतीच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता जिस्शू सेनगुप्तासोबत एक गाणे चित्रीत केले जाणार आहे. या गाण्यात या दोघांचा रोमांस पाहायला मिळणार आहे. या गाण्याच्या रिहर्सलला सुरूवात झाली आहे.१८ सप्टेंबरला मणिकर्णिकाची टीम या गाण्याचे चित्रीकरण करणार आहे. कर्जतमधील नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये या गाण्याचे चित्रीकरण पार पडणार आहे. चित्रपटाशी निगडीत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार निर्मात्यांसमोर एक दिवसात या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण करण्याचे आव्हान आहे. यापूर्वी कंगनाने सरोज खान यांच्यासोबत 'तनु वेड्स मनु रिटर्न'मध्ये काम केलेले आहे. 'मणिकर्णिका'मधील कित्येक सीन पुन्हा शूट केल्यामुळे निर्मात्यांचा सत्तर कोटींचा अतिरिक्त खर्च केला आहे. याव्यतिरिक्त दहा दिवसांचे पॅचवर्क आता पंचेचाळीस दिवसात केले जाणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाच्या पहिल्या स्क्रीनिंगवेळी सीन्स पाहून निर्माते नाखूश होते. याच कारणामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतः लेखक केवी विजेंद्र सिंग यांनी या सिनेमाची स्क्रीप्ट बदलण्यावर जोर दिला. विजेंद्र यांना वाटले की काही सीन्स आणखीन चांगल्याप्रकारे चित्रीत करता येऊ शकते. त्यामुळे निर्मात्यांनी रिशूट करण्यास सांगितले.सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात आणखीन एक गाणे असून त्या गाण्यावर कंगना व अभिनेत्री अंकिता लोखंडे थिरकताना दिसणार आहे. हे गाणे भव्यदिव्य पद्धतीने चित्रीत केले जाणार आहे.  

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीकंगना राणौतसरोज खान