Join us

सैफ अली खानच्या लेकीला 'या' अभिनेत्यासोबत घ्यायचे आहेत सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:43 IST

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स आपल्या डेब्यूसाठी सज्ज झाले आहेत मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चा आहे ती सैफ अली खानची मुलगी सारा अली खानची.

ठळक मुद्देसारा अली खान 'केदारनाथ' सिनेमातून डेब्यू करणार आहे

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स आपल्या डेब्यूसाठी सज्ज झाले आहेत मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चा आहे ती सैफ अली खानची मुलगी सारा अली खानची. साराने करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विद करण'मध्ये अनेक खुलासे केले आहेत. 

यावेळी साराला विचारण्यात आले की, तुला बॉलिवूडमध्ये कोणत्या अभिनेत्याला डेट करायला आवडले आणि कोणासोबत लग्न करायला आवडले ? यावर साराने खूपच इंटरेस्टिंग उत्तर दिले आहे. सारा म्हणाली, मला कार्तिक आर्यनला डेट करायला आवडले. मात्र लग्नाच्या प्रश्नावर तिने वेगळं उत्तर दिले तिला रणबीर कपूरसोबत लग्न करायला आवडले. 

सारा अली खान सुशांत सिंग राजपूतच्या अपोझिट केदारनाथ सिनेमातून डेब्यू करणार आहे. ‘केदारनाथ’ हा सिनेमा २०१३ मध्ये  केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. सिनेमात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक आहे. केदारनाथचा टीझर बघून इम्तियाज अलीने सारा अली खानला अप्रोच केले आहे. इम्तियाज अलीने सारा अली खानसोबत आपल्या सिनेमाबाबत चर्चादेखील केली आहे. रिपोर्टनुसार इम्तियाज अलीला सारा अली खानने होकार देखील दिला आहे. मात्र अजून कोणतिही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. साराच्या अपोझिट यात कार्तिक आर्यन दिसणार आहे.  

टॅग्स :सारा अली खानरणबीर कपूरसुशांत सिंग रजपूतकॉफी विथ करण 6