Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चालतानाही किती ओव्हरअॅक्टिंग करतीये'; रॅम्पवॉक केल्यामुळे सारा अली खान झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 11:51 IST

Sara ali khan: आपल्या साधेपणाने चाहत्यांची मनं जपणारी सारा नुकतीच तिच्या चालण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल झाली आहे.

कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकीच नम्र असलेली अभिनेत्री म्हणजे सारा अली खान (sara ali khan). 'केदारनाथ; (kedarnath) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराने आजवर अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. परंतु, अल्पावधीत अपार यश पाहूनही तिच्यातील नम्रपणा कायम आहे. त्यामुळेच सारा आज अनेकांची लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु, सध्या एका कार्यक्रमात तिने केलेल्या रॅम्पवॉकमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

आपल्या साधेपणाने चाहत्यांची मनं जपणारी सारा नुकतीच जियो वर्ल्ड प्लाझाच्या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने रॅम्प वॉक करत असताना दिलेल्या एक्स्प्रेशन्समुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अनेकांनी तिला हा कसा अॅटिट्यूड असा प्रश्नही विचारला आहे.

जियो वर्ल्ड प्लाझाच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सारा स्टायलिश लूकमध्ये दिसून आली. यावेळी तिने गोल्डन रंगाचा फूल स्लिव्हस टॉप आणि गोल्डन रंगाचा सेक्विन स्कर्ट परिधान केला होता. सोबतच तिने हाय बन बांधून हेअरस्टाइल केली होती. या लूकमध्ये ती प्रचंड स्टनिंग दिसत होती. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ मानव मंगलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

'कोणी तरी तिला सांगा ती कार्टून सारखी दिसतीये', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'हा कोणता फॅशन शो नाहीये ताई, जरा अक्कलेचा वापर करा', 'तिला कोणी तरी कसं चालायचं ते शिकवा. हे फार मजेशीर वाटतंय', 'ती अशी विचित्र पद्धतीने का चालतीये?', 'अरे यार, तिच्या चालण्यामध्येही किती ओव्हर अॅक्टिंग आहे', अशा कितीतरी कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर साराचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात तिच्यासोबत अर्जुन कपूर, रणवीर सिंह, नोरा फतेही, डायना पेंटी आणि रश्मिका मंदाना हे कलाकारही सहभागी झाले होते.

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडसेलिब्रिटीरणवीर सिंगअर्जुन कपूर