Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हा' अभिनेता आहे Sanjay Leela Bhansali यांचा खरा मित्र, सलमान की शाहरुख ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 14:01 IST

तर ती व्यक्ती कोण आहे, हे आपण जाणून घेऊया. 

संजय लीला भन्साळी हे कायमच चर्चेत असतात.  त्यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले. संजय लीला भन्साळी यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आतापर्यंत संजय लीला भन्साळी यांनी शाहरुख, सलमान खानपासून ऐश्वर्या राय आणि दीपिका पदुकोण-रणवीर सिंगपर्यंत बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. पण, बॉलिवूडमध्ये अशी एकच व्यक्ती आहे, जिला संजय लीला भन्साळी आपला खरा मित्र मानतात. तर ती व्यक्ती कोण आहे, हे आपण जाणून घेऊया. 

संजय लीला भन्साळी सध्या त्यांच्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. या सीरिजच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूडमधील मैत्रीवर भाष्य केलं. संपुर्ण बॉलिवूडमध्ये त्यांचं फक्त एकाच व्यक्तीसोबत मैत्रीचं नात आहे. ती व्यक्ती दबंग खान सलमान आहे. एका मुलाखतीमध्ये संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या व सलमान खानच्या मैत्रीबद्दल खुलासा केला. बॉलिवूडमधील एकमेव मित्र सलमान खान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

सलमानबद्दल बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले, 'एकमेव व्यक्तीबरोबर माझी अजूनही मैत्री आहे आणि तो म्हणजे सलमान खान. इन्शाअल्लाह चित्रपट होऊ शकला नसला तरी तो अजूनही माझ्यासोबत आहे. तो मला फोन करतो, माझी काळजी घेतो. तू ठीक आहेस ना? तुला काही हवंय का? असं तो विचारत असतो.  त्याचा फोन तीन महिन्यांतून एकदा येतो किंवा पाच महिन्यांतून एकदा येतोच,  त्याला माझ्या चित्रपटाची पर्वा नाही. त्याला माझी काळजी आहे'.

पुढे ते म्हणाले, 'एकत्र काम करताना कदाचित आम्ही भांडलो असू, आमचे विचार पटले नसतील. पण आम्ही पुन्हा एकमेकांशी बोललो, हीच तर मैत्री असते. त्यामुळे मी नशीबवान आहे की सहा महिन्यांतून एकदा बोलणारा आणि मागच्यावेळी बोलणं जिथे संपलं होतं. पुन्हा तिथूनच सुरुवात करणारा एक मित्र माझ्याजवळ आहे'. 

टॅग्स :संजय लीला भन्साळीसेलिब्रिटीबॉलिवूडसलमान खानशाहरुख खान