Join us

भन्साळींनी बदलले मूड ! आता रणवीर सिंगसोबत दीपिका नको तर हवी ‘ही’ हिरोईन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 20:05 IST

भन्साळींचे दीपिकावर जितके प्रेम आहे, तितकेच रणवीरही आहे. पण आता भन्साळींच्या या आवडत्या जोडीसंदर्भात एक वेगळीच बातमी कानावर येतेय.

संजय लीला भन्साळींची आवडती हिरोईन कोण? याचे उत्तर कुणीही देईल. होय, दीपिका पादुकोण. दीपिका ही भन्साळींची आॅल टाईम फेवरेट हिरोईन आहे. म्हणूनच भन्साळींच्या एकापाठोपाठ एक अशा तीन चित्रपटांत दीपिकाचीच वर्णी लागली. तिच्यासोबत दिसला तो रणवीर सिंग. कारण भन्साळींचे दीपिकावर जितके प्रेम आहे, तितकेच रणवीरही आहे. पण आता भन्साळींच्या या आवडत्या जोडीसंदर्भात एक वेगळीच बातमी कानावर येतेय. होय, आपल्या पुढील चित्रपटात भन्साळी रणवीर सिंगला कास्ट करणार आहेत. पण यात रणवीरची हिरोईन दीपिका नसून आलिया भट्ट असणार आहे.

होय, बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर व आलिया या दोघांना घेऊन एका नव्या प्रोजेक्टची योजना भन्साळींनी आखली आहे. दिग्दर्शिका जोया अख्तर हिने रणवीर व आलिया या जोडीला कधीचेच साईन केले आहे. या जोडीला घेऊन जोया ‘गली बॉय’ हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे शूटींगही पूर्ण झाले आहे. पण भन्साळींना याची चिंता नाही़.

खरे तर असेच एकदा भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटावेळी घडले होते. याचित्रपटात भन्साळी सर्वप्रथम सलमान खान आणि करिना कपूर या जोडीला कास्ट करणार होते. पण त्यापूर्वीच ही जोडी ‘क्योंकि’मध्ये दिसली आणि त्यामुळे भन्साळींना या जोडीला कास्ट करण्याचा निर्णय सोडून दिला होता. ( यानंतर या चित्रपटात रणवीर व दीपिकाची वर्णी लागली, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. ) पण आता कदाचित संजय लीला भन्साळी वेगळ्या मूडमध्ये आहेत. दीपिकासोडून त्यांना आलियाचं हवी आहे.

आलिया सध्या ‘कलंक’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या दोन चित्रपटात बिझी आहे. याऊलट रणवीर सिंग ‘सिम्बा’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. दीपिकाचे म्हणाल, तर तिने तूर्तास कुठलाच चित्रपट साईन केलेला नाही. लवकरच दीपिका व रणवीर लग्न करणार, अशी बातमी आहे आणि दीपिका आपल्या लग्नाच्या तयारीत गुंतली असल्याचे मानले जात आहे.

 

टॅग्स :संजय लीला भन्साळी