Ranveer is just my! Deepika Padukone declares love for her! | रणवीर फक्त माझा! दीपिका पादुकोणने दिली प्रेमाची जाहीर कबुली!!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या रिलेशनशिपमध्ये असण्याच्या बातम्या दीर्घकाळापासून चर्चेत आहेत. आता तर हे कपल लग्नाच्या बेडीत अडकणार, अशीही खमंग चर्चा आहे. खरे तर दीपिकावरचे प्रेम जगजाहिर करण्यात रणवीरने कधीही कंजुषी दाखवली नाही. त्याने अनेकदा तिच्यावरच्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. पण दीपिकाचा  कायम रणवीरसोबतचे रिलेशन नाकारण्याकडेच कल राहिला आहे. रणवीरबद्दल खुल्लम खुल्ला बोलताना ती कधीच दिसली नाही. पण कदाचित आता दीपिकानेही रणवीरला ‘आपले’ मानले आहे.  हे आम्ही नाही तर दीपिकाची एक कमेंट बोलतेय.


 
होय, त्याचे झाले असे की, अलीकडे रणवीरने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत रणवीर नेहमीप्रमाणे कमालीची हॅण्डसम दिसतोय. रणवीरने स्वत:चा हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी त्यावर धडाधड कमेंट्स देणे सुरू केले. 15 लाखांवर लोकांनी त्याच्या या फोटोला लाईक्स दिलेत. मग या सगळ्यात दीपिका कसे बरे मागे राहिल. तिनेही रणवीरच्या या फोटोवर कमेंट केली. हा फोटो पाहून दीपिकाने कमेंट बॉक्समध्शे ‘माईन’ असे लिहिले आहे. म्हणजेच, हा हॅण्डसम तरूण फक्त माझा आणि माझा आहे, असे दीपिकाने जाहीर करून टाकले.
स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, दीपिका आणि रणवीरचे लग्न 18 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान होणार आहे.  लग्नाच्या तयारीत कसल्याच गोष्टीची कमी पडू नये यासाठी दीपिकाच्या टीममधील प्रत्येकाला नोव्हेंबरमध्ये एकही सुट्टी घ्यायची नाही अशी ताकिद देण्यात आली आहे. दीपिकाच्या मेकअप आर्टिस्ट पासून ते मॅनेजरपर्यंत सगळ्यांना लग्नादरम्यान हजर राहण्याचे आदेश आहेत. अजून दीपिकाच्या पीआर टीमकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  

ALSO READ :    आईसोबत दागिणे खरेदी करताना दिसली दीपिका पादुकोण; ही ‘वेडिंग शॉपिंग’ तर नाही?

दीपिका व रणवीर या दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग हवे आहे. रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. त्यामुळे लग्नासाठी बीच वेडिंगचा पर्याय निवडला होता. पण त्यांच्या कुटुंबाना मात्र हे मान्य नाही. त्यामुळे हे लग्न मुंबईतचं होण्याची शक्यता अधिक आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार जवळपास सगळचे नातेवाईक मुंबईत आहेत.  डेस्टिनेशन वेडिंग केल्यास त्यांना सहभागी होता येणार नाही.   
Web Title: Ranveer is just my! Deepika Padukone declares love for her!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.