Join us
Daily Top 2Weekly Top 5

'संजू बाबा असा काही बेभान झाला की त्याने पत्नीला...', मान्यताने शेअर केला व्हिडिओ, होतोय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:37 IST

अभिनेता संजय दत्त आणि पत्नी मान्यता दत्त आज लग्नाचा १५ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

अभिनेता संजय दत्त आणि पत्नी मान्यता दत्त आज लग्नाचा १५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने मान्यताने पतीला शुभेच्छा देताना इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यात दोघेही 'तुम साथ हो जब अपने' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मात्र व्हिडिओतील संजयच्या एकंदर वर्तवणुकीमुळे तो चांगलाच ट्रोल होतोय. 

मान्यताने व्हिडिओ शेअर करताना लिहिले, '२१ वर्षं झाली आहेत. आम्ही सोबत आहोत. आम्ही चुका केल्या. एकमेकांची माफी मागितली. एकमेकांना दुसरी संधी दिली. माफ केले. मजा केली. गोँधळ घातला. सहनशील राहिलो. लग्नाच्या १५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!'

मान्यताने शेअर केलेल्या या व्हिडिओत संजय दत्त अगदीच नशेत दिसत आहे.' हा कसला डान्स' असं म्हणत युझर्सने त्याला ट्रोल केले आहे. व्हिडिओत संजय दत्त पत्नीला जोरात खेचताना दिसतो तर कधी धक्का देताना दिसतो. त्याला कशाचेच भान दिसत नाही. 'हे दोघेही जरा नशेतच दिसत आहेत' अशी कमेंट एकाने केली आहे. तर संजय दत्त फार काही डान्सच्या मूडमध्ये नाही असे वाटत आहे अशी कमेंट एकाने केली आहे.

टॅग्स :संजय दत्तपरिवारनृत्यसोशल मीडियाट्रोल