Join us
Daily Top 2Weekly Top 5

'KGF 2'साठी जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसला संजय दत्त, व्हायरल झालेत सेटवरील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 09:40 IST

संजय दत्तच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की, 'संजय दत्तने नुकतंच काम सुरू केलं आहे. त्याने 'भूज'साठीचं शूटींग पूर्ण केलं.

अभिनेता संजय दत्तने वेगवेगळ्या भूमिका साकारून आणि आपल्या बिनधास्त अंदाजाने लोकांच्या मनात जागा मिळवली. तेच आरोग्यासंबंधी समस्यामुळे काही दिवसांच्यानंतर आता संजू बाबा पुन्हा कामावर परतला आहे. संजय दत्तने 'केजीएफ २' ची शूटींग सुरू केली आहे. 

संजय दत्तच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की, 'संजय दत्तने नुकतंच काम सुरू केलं आहे. त्याने 'भूज'साठीचं शूटींग पूर्ण केलं आहे आणि आता 'केजीएफ २'चं शूटींग हैद्राबादमध्ये करत आहे. क्लायमॅक्स सीनसाठी कोळशाच्या खाणीत बरेच अ‍ॅक्शन सीन शूट होणार होते. निर्मात्यांनी संजय दत्तची हेल्थ रिकव्हरी बघता त्याला बॉडी डबल घेण्याचा सल्ला दिला होता. पण संजय दत्तने यासाठी नकार दिला. त्याने स्वत: अ‍ॅक्शन सीन्स केलेत'.

'केजीएफ २' चं सध्या शेवटचं शेड्यूल सुरू आहे. डिसेंबरमध्ये सुरू झालेलं शूट डिसेंबरमध्येच पूर्ण होणार आहे. संजय दत्त रोज शूटींग करत आहे आणि ब्रेकही कमीच घेत आहे. याच शूटच्या सेटवरील त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

या सिनेमाच्या निमित्ताने संजय दत्त आणि यश हे दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, 'असं अजिबात वाटत नाहीये की, यश आणि संजू बाबा पहिल्यांदा एकत्र शूट करत आहेत. शूटींगदरम्यान दोघे चांगलेच सहज झाले आहेत. दोघेही शूटींग एन्जॉय करत आहेत.  

टॅग्स :केजीएफसंजय दत्तबॉलिवूडसोशल व्हायरल