Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हा पाकिस्तानी मुलींशीही लग्न करेल' अवॉर्ड शोमध्ये शाहरुखने आधीच केली होती शोएबची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 18:13 IST

"भारतात आहेस इथे पंगा घेऊ नकोस" अशी ताकीदही शाहरुखने भर स्टेजवर शोएबला दिलेली दिसते. हा शॉकिंग व्हिडिओ एकदा पहाच.

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) सध्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने (Shoaib Malik) पाकिस्तानचीच अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न करत सर्वांना धक्का दिला. यानंतर सानियाच्या कुटुंबाने तिने आधीच 'खुला' घेतल्याची माहिती दिली. म्हणजेच सानिया मिर्झाने काही महिन्यांपूर्वीच शोएबला घटस्फोट दिल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या सानियाला भारताकडूनच नाही तर पाकिस्तानाच्या जनतेकडूनही पाठिंबा मिळतोय. तर शोएब मलिकवर सगळेच टीका करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये शाहरुख खानने सानिया आणि शोएबशी गप्पा मारल्या आहेत. व्हिडिओत शाहरुखने विचारलेल्या उत्तरांमधूनच शोएब सानियाशी लग्न केल्यावर फारसा सीरिअर नव्हता असंच दिसतंय. 

हा व्हिडिओ एका अवॉर्ड शोमधला आहे. यामध्ये शाहरुख शोएब आणि सानियाला काही प्रश्न विचारताना दिसत आहे.

शाहरुख - सानिया, तू शोएबमध्ये असं काय पाहिलं की त्याच्याशी लग्नच केलंस?सानिया- मी तर खूप काही बघितलं आहे. तो खूपच लाजाळू आहे. तुम्हीच त्याला जरा बोलायला शिकवा.शाहरुख - ते तर मी करेनच. काळजी करु नकोस.

शाहरुख - शोएब, तुला सानियामध्ये असं काय आवडलं की तू प्रेमात पडला. शोएब - विचार करायचा वेळच नाही मिळाला त्याआधीच लग्न झालं.

ग्लॅमबिट्झने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

यानंतरचा भाग युट्यूबवर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख म्हणतो, 'भारतात आहेस इथे पंगा घेऊ नको. '

शाहरुख -  तू जेव्हा सानियाला पाकिस्तानात घेऊन गेला. तेव्हा तिथल्या सुंदर मुली म्हणल्या असतील आम्ही काय सगळ्या मेलो होतो जे तू भारतातून घेऊन आलास? तू त्यांना काय उत्तर दिलंस?

शोएब - सानियाला घेऊन गेलो यातच त्यांना उत्तर मिळालं.

तेव्हा शाहरुख म्हणतो, 'बॅकस्टेज याने वेगळं उत्तर दिलं होतं. तो म्हणाला होता थोडी वाट पाहा मी तुमच्याशीही करेन'

शाहरुखचं वाक्य ऐकून सानिया भडकते आणि रागातच 'एक्सक्युज मी ?' असं म्हणते. ही जुनी मुलाखत सध्याच्या सानिया आणि शोएबच्या परिस्थितीवर अगदी चपखल बसत आहे. शाहरुखने घेतलेली ही मजा मस्तीतील मुलाखत आता व्हायरल होत आहे. 

टॅग्स :शाहरुख खानसानिया मिर्झाशोएब मलिकसोशल मीडिया