Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 11:04 IST

'अपना सपना मनी मनी', 'क्या कूल है हम' सिनेमांचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचं दुःखध निधन झालंय (sangeeth sivan)

बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचं बुधवारी निधन झाले. संगीत सिवन यांच्या निधनाने बॉलिवूड स्टार्सनी शोक व्यक्त केला आहे. संगीत सिवन ६५ वर्षांचे होते. संगीत सिवन यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अभिनेता रितेश देशमुख - श्रेयस तळपदे आणि इतर कलाकारांनी संगीत सिवन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 सिवन यांच्या निधनाबद्दल बॉलिवूडसह सिनेतारकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. संगीत सिवन यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सिवन यांनी 'क्या कूल हैं हम' आणि 'अपना सपना मनी मनी' सारखे सुपरहिट कॉमेडी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. सिवनचा यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना रितेश देशमुखने एक भावनिक नोट लिहिली आहे. ज्यामध्ये रितेशने लिहिले की, 'संगीत सिवन सर राहिले नाहीत, या बातमीने मला खूप दुःख झाले आहे."

रितेशने पुढे लिहिलं की,  "एक नवोदित अभिनेता म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काम करण्याची संधी दिली. क्या कूल हैं हम आणि अपना सपना मनी मनी चे दिवस मला अजूनही आठवतात.  सिवन हे एक उत्तम माणूस आणि उत्तम व्यक्तिमत्व होते. या निधनाच्या वृत्ताने मला हादरवून सोडले आहे.' अशी पोस्ट लिहित रितेशने सिवन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय अभिनेता श्रेयस तळपदेनेही पोस्ट करुन सिवन यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.

टॅग्स :रितेश देशमुखश्रेयस तळपदेबॉलिवूड