Join us

'सनम तेरी कसम'च्या यशानंतर दिग्दर्शक-निर्मात्यांमध्ये तू तू मै मै! नेमका हक्क कोणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:46 IST

यश मिळताच सिनेमाच्या दिग्दर्शक निर्मात्यामध्ये तू तू मै मै सुरु झालं आहे.

सध्या 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) हा सिनेमा थिएटरमध्ये रि रिलीज झाला आहे. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमकूळ घातला आहे. २०१६ साली जेव्हा सिनेमा पहिल्यांदा रिलीज झाला तेव्हा तो फ्लॉप झाला होता. पण नंतर टीव्ही आणि इतर माध्यमांवर आल्यावर सिनेमाला तरुण वर्गाने उचलून धरलं. याचे रील्स, संवाद व्हायरल झाले. त्यामुळे सिनेमा ९ वर्षांनी रि रिलीज करण्यात आला. आज याला भरघोस यश मिळतंय. दरम्यान याच्या सीक्वलचीही चर्चा सुरु झाली आहे. मात्र यश मिळताच सिनेमाच्या दिग्दर्शक निर्मात्यामध्ये तू तू मै मै सुरु झालं आहे.

'सनम तेरी कसम' सिनेमाचे निर्माते दीपक मुकूट (Deepak Mukut) हे आहेत. तर राधिका राव (Radhika Rao) आणि किरण सप्रू (Kiran Sapru) यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान एका मुलाखतीत निर्माते म्हणाले, "मी निर्माता असल्याचे सिनेमाचा आयपी माझ्याकडे आहे. त्यामुळे सिनेमाचा सीक्वल, प्रीक्वल किंवा रिमेक करायचा असल्यास त्याचे हक्क माझ्याकडे आहेत. मी सप्टेंबर महिन्यात सीक्वेलची घोषणा केली होती. याबाबत माझी दिग्दर्शकांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. सीक्वल कोण दिग्दर्शित करणार हे अजून मी ठरवलेलं नाही. त्यामुळे किरण सप्रू मुलाखतींमध्ये सीक्वेलबद्दल बोलत आहे पण हक्क तर माझ्याकडेच आहेत."

तर दुसरीकडे दिग्दर्शक राधिका राव आणि किरण सप्रू यांनीही सीक्वल बनवत असल्याचा दावा केला. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यातच आता तू तू मै मै सुरु झालं आहे. याचा काय निष्कर्ष लागतो ते पाहणं महत्वाचं आहे.

'सनम तेरी कसम' ७ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे च्या पहिल्याच दिवशी रिलीज झाला होता. सिनेमाने २०१६ मध्ये १६ कोटींची कमाई केली होती. तर नुकताच रि रिलीज झाल्यावर सिनेमाने थेट ३४.२९ कोटींची कमाई केली.  

टॅग्स :बॉलिवूडहर्षवर्धन राणे