Join us

Samantha Ruth Prabhu :  मी अजून मेले नाहीये...;  बोलता बोलता रडू लागली सामंथा रूथ प्रभु, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 16:15 IST

Samantha Ruth Prabhu: एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सामंथा आपल्या आजारपणावर बोलली आणि बोलता बोलता रडू लागली. तिच्या अश्रूंचा बांध फुटला.

‘पुष्पा’ सिनेमातील ‘ऊ अंटावा’ या गाण्यातील बोल्ड अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी, ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु  (Samantha Ruth Prabhu) सध्या प्रकृती कारणामुळे चर्चेत आहे. सामंथा सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतेय. मायोसिटिस आजाराने ती ग्रस्त आहे. अशाही स्थितीत सामंथा ‘यशोदा’ या आपल्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करतेय. अशाच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सामंथा आपल्या आजारपणावर बोलली आणि बोलता बोलता रडू लागली. तिच्या अश्रूंचा बांध फुटला.

 सामंथाचा ‘यशोदा’ हा सिनेमा 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती बिझी आहे. प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत सामंथाला तिच्या आजारपणाबद्दल विचारण्यात आलं आणि बोलता बोलता समांथाला अश्रू अनावर  आले. या मुलाखतीचा समांथाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

‘आजारपणाशी लढत असताना अनेकदा वाटलं आता सगळं संपलं. हा प्रवास चढऊतारांनी भरलेला होता. या आजाराशी झुंज देणं कठीण आहे. पण मी लढण्यासाठी तयार आहे. काही दिवस चांगले असतात, काही दिवस वाईट असतात. अनेकदा आपण निराश होतो. पण अखेर आपण जिंकतो. हे सगळं कठीण आहे. पण मी इथे आहे आणि लढणार आहे,’असं ती म्हणते. यादरम्यान तिच्या डोळ्यांत अश्रू तरळतात.

मी अजून मेले नाहीये...सामंथाच्या आजाराबद्दल सध्या वेगवेगळ्या अफवा ऐकायला मिळत आहेत. याबद्दल बोलताना सामंथाने संताप व्यक्त केला. मी काही बातम्या वाचल्या. त्यात माझी प्रकृती गंभीर असल्याचं लिहिलेलं होतं. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की, हा काही जीवघेणा आजार नाही. मी अद्याप मेली नाहीये. माझ्या मते, अशा हेडलाइन्सची गरज नाही.सामंथा गेल्या काही महिन्यांपासून मायोसिटिस नावाच्या आजाराचा सामना करत आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. सोबत सिनेमाचं डबिंग करता करता ट्रिटमेंट सुरू असल्याचा फोटो तिनं शेअर केला होता. यात तिच्या हाताला सलाइन लावलेली दिसत आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodसेलिब्रिटी