Join us

हे काय?? घटस्फोटाच्या चर्चांमध्ये समंथाचा वेडिंग लूक व्हायरल; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 13:16 IST

Samantha akkineni : समंथा नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेऊन पुन्हा नव्याने संसार थाटणार की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

ठळक मुद्देसमंथाने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर दागिने घातले आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य ही लोकप्रिय दाक्षिणात्य जोडी विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. या घटस्फोटामागे अभिनेत्री साई पल्लवी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर अलिकडेच समंथाने सोशल मीडियावर तिचं अक्किनेनी हे आडनाव हटवून टाकलं. त्यामुळे या चर्चांनी आता जोर धरला आहे. मात्र, या चर्चांमध्येच समंथाचा एक फोटो व्हायरल होत असून यात ती वेडिंग लूकमध्ये दिसत आहे. त्यामुळे समंथा नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेऊन पुन्हा नव्याने संसार थाटणार की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

अलिकडेच समंथाने इन्स्टाग्रावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती वेडिंग लूकमध्ये दिसून येत आहे. समंथाने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर दागिने घातले आहेत. या फोटोमध्ये ती नववधूप्रमाणेच दिसत असल्यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

समंथाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने लाल रंगाची रुद्र बनारसी साडी नेसली आहे. सोबतच केसात गजरा माळला असून दागदागिनेही घातले आहेत. त्यामुळे समंथा पुन्हा लग्न करणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, समंथाचे हे फोटो एका फोटोशूटचा भाग असल्याचं सांगण्यात येत आहे.

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच समंथाने दिली नागा चैतन्यच्या पोस्टवर कमेंट; म्हणाली...

दरम्यान, समंथाला साड्यांची विशेष आवड आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती कोणत्याही कार्यक्रमात साडीमध्येच पाहायला मिळते. अलिकडेच तिची 'फॅमिली मॅन 2' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामुळे सध्या समंथा सातत्याने चाहत्यांमध्ये चर्चेत येत आहे. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodसेलिब्रिटी