Join us

कॅटरिना कैफमुळे थांबले ‘भारत’चे शूटींग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 13:41 IST

होय, गेल्या काही दिवसांपासून ‘भारत’चे शूटींग थांबले आहे आणि याला कारण आहे कॅटरिना कैफ.

ठळक मुद्दे‘भारत’  हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

सलमान खानच्या ‘भारत’ या आगामी चित्रपटाकडे चाहते डोळे लावून बसले आहेत.   याच चाहत्यांसाठी एक ताजी बातमी आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून ‘भारत’चे शूटींग थांबले आहे आणि याला कारण आहे कॅटरिना कैफ. होय, कॅटरिनाच्या पायाला इजा झालीय आणि त्याचमुळे चित्रपटाचे शूटींग रखडले आहे.अलीकडे एका इव्हेंटमध्ये कॅटरिना कैफ हातात काठी घेऊन दिसली होती. तिच्या पायाला पट्टी बांधलेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भारत’चा एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना कॅटरिनाच्या पायाला जबर दुखापत झाली. या दुखापतीमुळे तिला शूटींग करणे कठीण झाले आणि निर्मात्यांना ते थांबवावे लागले. कॅटरिनाला पूर्णपणे बरी व्हायला आणखी काही दिवस लागणार आहेत. तूर्तात ती विश्रांती घेतेय. कॅटरिना लवकर बरी होवो आणि ‘भारत’चे शूटींग लवकरात लवकर सुरु होवो, हीच अपेक्षा.

‘भारत’ या चित्रपटासाठी आधी प्रियंका चोप्राला साईन करण्यात आले होते. पण ऐनवेळी प्रियंकाने तिच्या लग्नाचे कारण देत या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. यानंतर भाईजान प्रियंकावर नाराज असल्याच्याही बातम्या आल्या. प्रियंकाने ऐनवेळी ‘दगा’ दिला म्हटल्यावर या चित्रपटात तिच्या जागी नव्या हिरोईनचा शोध घेणे निर्मात्यांना भाग पडले आणि अचानक प्रियंकाच्या  जागी कॅटरिनाची वर्णी लागली. ‘भारत’  हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड आॅडियन्सपर्यंत सीमित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे. 

टॅग्स :कतरिना कैफभारत सिनेमासलमान खान