Salman Khan Visits Shera Home: सलमानचा खास बॉडीगार्ड म्हणून प्रसिद्ध असलेला शेरा उर्फ गुरमीत सिंह जॉलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेराचे वडील सुंदर सिंह जॉली यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते, पण अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. शेराने आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली. या कठीण प्रसंगी सलमान खान स्वतः शेराच्या घरी पोहोचला आणि त्याला मिठी मारून भावनिक आधार दिला.
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खान शेराच्या घरी पोहोचताना दिसतोय. गाडीतून उतरताच तो शेराला पाहतो आणि त्याला घट्ट मिठी मारतो. शेराने सलमान खानला गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक संकटात सावलीसारखी साथ दिली आहे. आज, जेव्हा शेराच्या आयुष्यात दुःखाचा काळ आला, तेव्हा सलमानही त्याचा आधार बनला.
शेराचे वडील सुंदर सिंग जॉली यांच्यावर काल दुपारी ४ वाजता मुंबईत अंतिम संस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी शेराच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसून येत होतं. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह अनेक जवळचे मित्र त्याच्या पाठीशी उभे होते. सर्वजण शेराचं सांत्वन करुन त्याला धीर देत आहेत.
शेराचं खरे नाव गुरमीत सिंह जॉली आहे. तो बॉलिवूडमध्ये ‘शेरा’ या नावाने ओळखला जातो. १९९५ पासून शेराने सलमान सोबत काम करायला सुरूवात केली. तसेच त्याची टायगर सिक्युरिटी नावाची फर्म आहे, जी इतर कलाकारांना सुरक्षा पुरवण्याचे काम करते. २०१७ मध्ये मुंबईत झालेल्या जस्टिन बीबरच्या कॉन्सर्ट दरम्यान शेराने जस्टिन बीबरची सुरक्षा विशेषतः सांभाळली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेराची आजची एकूण संपत्ती सुमारे १०० कोटी रुपये आहे. सलमान त्याला दरमहा १५ लाख रुपये पगार देतो, जो दरवर्षी सुमारे २ कोटी रुपये होतो. त्याच्याकडे १.४० कोटी रुपयांच्या रेंज रोव्हरसह अनेक महागड्या गाड्या आहेत.