सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपूर्वी 'सिकंदर'चा पहिला प्रोमो रिलीज झाला होता. या प्रोमोत सलमानच्या अनोख्या स्वॅगने सर्वांचं लक्ष वेधलं. आता सर्वांना उत्सुकता आहे 'सिकंदर'च्या ट्रेलरची. 'सिकंदर'च्या ट्रेलर रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आलीय. हा ट्रेलर भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीदरम्यान दाखवला जाणार आहे. जाणून घ्या.
या खास दिवशी रिलीज होणार 'सिकंदर'चा ट्रेलर
फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफी २०२५ सुरु होणार आहे. सध्या आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर'च्या मेकर्सने चॅम्पियन ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान 'सिकंदर'चा ट्रेलर रिलीज करण्याचा प्लान बनवला आहे. अर्थात २३ फेब्रुवारीला चॅम्पियन ट्रॉफी लीगमध्ये भारत-पाकिस्तानचा जो सामना होणार आहे, त्याचदरम्यान 'सिकंदर'चा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे.
'सिकंदर' विषयी
'सिंकदर' सिनेमात 'बाहुबली' फेम अभिनेता सत्यराजने खलनायकाची भूमिका साकारली आहे. तर सलमानसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर सत्यराज, प्रतीक बब्बर, काजल अग्रवाल आणि शर्मन जोशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन ए आर मुरगूदास यांनी केले असून 'गजनी', 'हॉलिडे'नंतर पुन्हा एकदा ते 'सिकंदर'च्या माध्यमातून अॅक्शन सिनेमाची धुरा सांभाळणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. हा सिनेमा २०२५ मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे.