बॉलिवूड सिनेमा म्हटलं की त्यात लव्हस्टोरी, फायटिंग, क्लायमॅक्स हे सगळं आलंच. यात खासकरुन प्रेक्षकांना सिनेमातील फायटिंग वा अॅक्शन सीन पाहायला जास्त आवडतात. कलाकारही हे सीन खरे वाटावेत यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकदा हे सीन करतांना सेटवर अपघातही घडतात. असाच अपघात एकदा लोकप्रिय अभिनेता अशोक सराफ यांच्या सोबत झाला होता.
एका हिंदी सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतांना सलमान खानच्या हातातून नकळतपणे अशोक सराफ यांच्या गळ्यावर चाकूने वार झाले होते. हा किस्सा अशोक सराफ यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला. सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'जागृती' हा सिनेमा १९९२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सलमानसह अशोक सराफ यांनी स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या सिनेमात अशोक सराफ यांची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
अशोक सराफ यांच्या गळ्यावर झाला वार
"या सिनेमामध्ये एक फायटिंग सीन होता. या सीनमध्ये सलमानने माझ्या गळ्यावर चाकू धरला होता. सीनचं शुटिंग सुरु झालं आणि आम्ही आमचे डायलॉग्स सुरु केले. याचवेळी मी त्याच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करत होतो.आणि, सलमान त्यावेळी मला जोरात आवळून पकडून ठेवायचा प्रयत्न करत होता. हा सगळा शुटिंगचा भाग होता. मात्र, माझ्या गळ्याला चाकू लागत होता. त्यावेळी मी सलमानला म्हणालो, जरा हळू माझ्या गळ्याला चाकू लागतोय," असं अशोक सराफ म्हणाले.
अशोक मामांच्या गळ्याभोवती झाली जखम
पुढे अशोक सराफ म्हणाले, "सलमानच्या हातून नकळतपणे अशोक मामांच्या गळ्याभोवती जखम झाली होती. त्यामुळे सलमान थोडा घाबरला आणि आता काय करु असं विचारलं. त्यावर, चाकू उलटा पकड असा सल्ला मी त्याला दिला. मात्र, कॅमेराचा फोकस आमच्यावरच होता. त्यामुळे ते करणंही शक्य नव्हतं. शेवटी मी विचार केला आणि म्हटलं जाऊ दे. त्याच परिस्थितीत आम्ही कसाबसा तो सीन पूर्ण केला. मात्र, सीन पूर्ण झाल्यानंतर पाहिलं तर माझ्या गळ्याभोवती बरीच खोलवर जखम झाली होती. जर तो चाकू आणखी थोडा लागला असता तर माझी नस कापली गेली असती आणि त्याचक्षणी माझं बरंवाईट झालं असतं. तो सीन मी कधीच विसरणार नाही."
दरम्यान, सलमानचा जागृती हा सिनेमा त्याकाळी फारसा गाजला नाही. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई केली. या सिनेमात अशोक सराफ, सलमान व्यतिरिक्त करिश्मा कपूर, शिवा रिंदानी, पंकज धीर हे कलाकारदेखील होते.
Web Summary : Ashok Saraf was accidentally injured on set during a film shoot when Salman Khan's knife cut his neck during a fight scene. Saraf recounted the incident, stating that he narrowly avoided a serious injury. The movie 'Jagruti' didn't perform well.
Web Summary : एक फिल्म की शूटिंग के दौरान सलमान खान के चाकू से गलती से अशोक सराफ घायल हो गए। सराफ ने बताया कि लड़ाई के सीन में उनकी गर्दन पर चाकू लग गया था और वे गंभीर रूप से घायल होने से बाल-बाल बच गए। 'जागृति' फिल्म बॉक्स ऑफिस पर सफल नहीं रही।