Join us

'तौबा तौबा' गाणं पाहून विकी कौशलवर फिदा झाला सलमान खान, म्हणतो- "तुझे डान्स मुव्ह्स..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 11:57 IST

सलमानला विकी कौशलचं कौतुक, 'तौबा तौबा' गाणं पाहून अभिनेत्यासाठी केली खास पोस्ट

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या 'बॅडन्यूज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विकीच्या 'बॅडन्यूज' सिनेमातील तौबा तौबा हे गाणं अलिकडेच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातील विकीच्या डान्सचं सर्वत्र कौतुक होत आहे. या गाण्यातील त्याचे डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. एवढंच काय तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने देखील विकीच्या डान्सचं कौतुक केलं आहे. 

विकी कौशलचा डान्स पाहून सलमान खानदेखील आश्चर्यचकित झाला आहे. त्याने विकीचं कौतुक केलं आहे. सलमानने विकी साठी इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. तौबा तौबा गाण्यातील विकीच्या डान्सचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. ही स्टोरी शेअर करत सलमानने विकीचं कौतुक केलं आहे. "विकी डान्स मुव्ह्स कमाल आहेत. गाणं पण खूप छान वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा", असं सलमानने स्टोरीमध्ये म्हटलं आहे. सलमानने केलेलं कौतुक पाहून विकीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही स्टोरी शेअर करत त्याने सलमानचे आभार मानले आहेत. "सो स्वीट ऑफ यू सलमान सर...थँक यू सो मच. माझ्यासाठी आणि टीमसाठी याचं खूप मोल आहे," असं विकीने म्हटलं आहे. 

केवळ सलमानच नव्हे तर ऋतिक रोशननेही विकी कौशलच्या डान्सचं कौतुक केलं होतं. विकीची डान्स स्टाइल पसंतीस उतरल्याचं ऋतिकने म्हटलं होतं. विकीचा तौबा तौबा डान्स पाहून नेटकऱ्यांना कतरिना कैफच्या कमली कमली गाण्याची आठवण झाली होती. प्रदर्शित झाल्यापासूनच विकीचं हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. 

दरम्यान, विकी कौशलच्या 'बॅडन्यूज'  सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अमी विर्क मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केलं आहे. १९ जुलैला हा विकी कौशलचा हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 

टॅग्स :विकी कौशलसलमान खानसेलिब्रिटी