Join us

"दाक्षिणात्य इंडस्ट्री तांत्रिकदृष्ट्या पुढे पण...", सनी देओलनंतर सलमान खाननेही केलं साउथचं कौतुक

By ऋचा वझे | Updated: March 27, 2025 11:45 IST

हिंदीतील फिल्ममेकर्सने साउथकडून शिकलं पाहिजे असं सनी देओल म्हणाला होता. त्यावर सलमानने भाष्य केलं आहे.

बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. त्याचा आगामी 'सिकंदर' (Sikandar) सिनेमा ईदच्या मुहुर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास यांनी केलं आहे. सध्या साऊथ सिनेमे, साऊथ दिग्दर्शक, फिल्ममेकर्सची चलती आहे. बॉलिवूडमध्येही आता ते एन्ट्री घेत आहेत. अॅटलीनंतर ए.आर. मुरुगदासही हिंदीत नशीब आजमावत आहेत. काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप आणि सनी देओल यांनी साउथचं कौतुक केलं. हिंदीतील फिल्ममेकर्सने साउथकडून शिकलं पाहिजे असंही सनी देओल म्हणाला. आता यावर सलमानने खाननेही भाष्य केलं आहे. 

सलमान खानने काल 'सिकंदर'च्या प्रमोशननिमित्त माध्यमांशी संवाद साधला. वेगवेगळ्या विषयांवरील प्रश्नांवर त्याने उत्तरं दिली. साउथ इंडस्ट्रीचं अनेकजम कौतुक करत आहेत. यावर तो म्हणाला, "दाक्षिणात्य इंडस्ट्री तांत्रिकदृष्ट्या खूप पुढारलेली आहे. भावनिकरित्याही ते पुढे आहेत. ते नेहमीच काही ना काही नवीन आणतात. सिनेमातून दुसरा सिनेमा बनवत नाहीत. ते  मात्र तिथेही जे सिनेमे चालतात तेच आपल्याला कळतात. जसे हिंदीतील काही चित्रपट हिट होतात. तसंच साउथमध्ये दर आठवड्याला दोन-तीन सिनेमे रिलीज होत असतात. त्यातले काही सिनेमेच गाजतात जे आपल्या कानावर येतात. त्यामुळे सगळीकडे सारखंत आहे. चांगले सिनेमे बनवाल तर ते चालतील."

ॲटलीसोबतचा सिनेमा येणार की नाही? यावर सलमान म्हणाला, "हा सिनेमा सध्या बनतोय असं मला वाटत नाही. एक वेळ होती जेव्हा याचं काम सुरु होतं. आम्ही गोष्टी जमवून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण जमलं नाही. मला वाटतं सिनेमाच्या बजेटमुळे हे घडलं. कारण खूप हाय बजेटचा हा सिनेमा होता. त्यामुळे आता तो पुढे ढकलला आहे. दोन सिनेमांएवढा वेळ त्यात गेला असता. आता मला एक सिनेमा करायला वेळ मिळाला आहे."

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडTollywood