Join us

जोनास कॉनर कोण आहे? सलमान खानने १५ वर्षांच्या मुलाचा फोटो शेअर करून केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 16:51 IST

कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत चर्चेत राहणाऱ्या सलमान खानने एका १५ वर्षांच्या मुलाचे कौतुक केलंय.

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सध्या सलमानच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट मात्र कोणत्याही चित्रपट, इव्हेंट किंवा प्रमोशनशी संबंधित नसून एका १५ वर्षीय गायकाबद्दल आहे.

सलमान खान याने एका १५ वर्षांच्या अमेरिकन गायकाचे कौतुक केले आहे. सलमानने त्याच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर एक ट्विट केले. ज्यात त्याने जोनासबद्दल लिहलं, "मी कधीही एखाद्या १५ वर्षांच्या मुलाला आपल्या वेदना इतक्या सुंदर कलाकृतीत रुपांतरित करताना पाहिलं नव्हतं.  देव तुझं भलं करो जोनास कॉनर, मी तुझी 'फादर इन अ बायबल', 'पीस विथ पेन', 'ओह अप्पालाचिया' ही गाणी वारंवार ऐकतोय."

सलमानने पुढे सर्वांना आवाहन केले की, "जर आपण अशा मुलांना पाठिंबा देत नसू तर आपण काय केलं आहे? भावांनो आणि बहिणींनो, हे इंग्रजीत आहे, पण इथेही असे अनेक आहेत. त्यांना प्रोत्साहन द्या, शोषण करू नका".

कोण आहे जोनास कॉनर?जोनास कॉनर (Jonas Conner) हा एक अमेरिकन किशोरवयीन गायक आहे, जो त्याच्या उत्कृष्ट गायनासाठी ओळखला जातोय. त्याची 'फादर इन अ बायबल', 'पीस विथ पेन', 'ओह अप्पालाचिया' ही तीन गाणी खूप प्रसिद्ध झाली आहेत, ज्यामुळे सलमान खानसारखा सुपरस्टारही त्याचा चाहता बनला आहे. जोनासने त्याच्या आवाजाच्या जादूने अनेक लोकांची मने जिंकली आहेत.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आगामी 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो सध्या लडाखमध्ये शूटिंग करत आहे, जिथे अभिनेत्री चित्रांगदा सिंह त्याच्यासोबत पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबतच सलमान वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस १९' चे सूत्रसंचालन करतानाही दिसत आहे.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटी