Join us

भाईजानच्या बर्थडेचा जामनगरमध्ये जल्लोष; अंबानी कुटुंबाकडून भव्य पार्टी, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:21 IST

सलमानच्या बर्थडे बॅशचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान यानं  २७ डिसेंबर ५९ व्या वर्षात पदार्पण केलं. सलमानच्या वाढदिवसाला थेट अंबानी कुटुंबाकडून भव्य पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. सलमान याने त्याचा वाढदिवस  जामनगरमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साजरा केला. सलमान खान आणि अंबानी कुटुंबाची खास मैत्री आहे. अनेकदा भाईजानसोबत त्यांचा बाँड दिसून आला आहे. अनंत (Anant Ambani) आणि सलमान खान (Salman Khan) यांचीही मैत्री खास आहे. 

सलमानच्या बर्थडे बॅशचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओमध्ये सलमान त्याची भाची आयतसोबत केक कापताना दिसत आहे. खरं तर, आयत आणि सलमानची जन्मतारीख एकच आहे. म्हणूनच सलमान नेहमी आयतसोबत केक कापतो. आयत ही सलमानची धाकटी बहीण अर्पिता हिची मुलगी असून ती 5 वर्षांची आहे.

अभिनेत्याचा बर्थडे साजरा करण्यासाठी सलमानचं कुटुंब हे चार्टर्ड प्लेननं जामनगरमध्ये पोहचलं होतं. ही बर्थडे पार्टी 'वनतारा'मध्ये ठेवण्यात आली होती.  मुकेश अंबानी आणि नीता यांनी सलमानसाठी गाणं गायलं आणि त्याला खास शुभेच्छा दिल्या. या पार्टीची थीम सर्व ब्लॅक होती. त्यामुळे सर्व पाहुणे हे काळ्या रंगाच्या कपड्यात दिसले. एवढंच काय तर सलमानच्या बर्थडे बॅशमध्ये फटाके फोडण्यात आले. 

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या 'सिकंदर' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. 1 मिनिट 41 सेकंदाच्या टीझरमध्ये सलमान खान दमदार ॲक्शन करताना पाहायला मिळतोय. या सिनेमाचे दिग्दर्शन ए आर मुरगूदास यांनी केले आहे. तर  या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. हा सिनेमा २०२५ मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमानसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत.  

टॅग्स :सलमान खानअर्पिता खाननीता अंबानीमुकेश अंबानीजामनगरसेलिब्रिटीबॉलिवूड