Join us

'मी मारलं असतं तर ती वाचली नसती' सलमानने ऐश्वर्याच्या आरोपांवर दिलं होतं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 11:30 IST

सलमानने तिच्या घराबाहेर, शूटिंग सेटवर येऊन हंगामा केला. तसंच तिच्या हातही उचलला असे तिने आरोप केले होते.

बॉलिवूडमधीलसलमान खान आणि ऐश्वर्या रायची जोडी खूप लोकप्रिय होती. 'हम दिल दे चुके सनम' मध्ये त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली. ९० च्या दशकात दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा उडाल्या. इतकंच नाही तर ऐश्वर्याने सलमानवर गंभीर आरोप लावले. सलमानने तिच्या घराबाहेर, शूटिंग सेटवर येऊन हंगामा केला. तसंच तिच्या हातही उचलला असे तिने आरोप केले. या आरोपांवर सलमान खानने उत्तर दिलं आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला होता की, 'आता तिने असं सांगितलंच आहे तर मी काय बोलू. तेव्हा मी म्हटलं होतं की जर मी कोणाला मारलं तर स्वाभाविक आहे भांडणं होतील. मला राग येईल तेव्हा मी माझा बेस्ट शॉट देईल.मला नाही वाटत ती यातून वाचली असती. हे खरं नाही आणि मला माहित नाही ती असं का म्हणाली.'

तो पुढे म्हणाला,'एकदा एका पत्रकाराने मला विचारलं होतं की तुम्ही रागात टेबलवर हात मारला होता आणि टेबल तुटला होता का? अशा गोष्टी माझ्याबाबत बोलल्या जातात त्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा.'

सलमान खान आणि ऐश्वर्या राय नुकतेच मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दोघंही एकाच छताखाली आले होते. मात्र ब्रेकअपनंतर आजपर्यंत सलमान-ऐश्वर्याने कधीच एकमेकांसमोर येऊन बोललेले नाहीत. तरी आज इतक्या वर्षांनीही या दोघांची लव्हस्टोरीची चर्चा होत असते.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनसलमान खानबॉलिवूड