Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिने हजारदा अर्पिताला फोन केला होता...! प्रियांका चोप्राने ‘भारत’ सोडल्यामुळे भडकला भाईजान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 20:58 IST

प्रियांकाने ‘भारत’ सोडून महिना उलटलाय. पण अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. काही दिवस सलमानने प्रियांकाच्या निर्णयावर बोलणे टाळले. पण आता मात्र अचानक त्याने एकावर एक जोरदार खुलासे करणे सुरू केले आहे

प्रियांका चोप्राने सलमान खानचा ‘भारत’ सोडला अन् सगळीकडे एकच खळबळ माजली. खरे तर प्रियांकाने ‘भारत’ सोडून महिना उलटलाय. पण अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. काही दिवस सलमानने प्रियांकाच्या निर्णयावर बोलणे टाळले. आपण नाराज नाही, हे भासवण्याचा वरकरणी प्रयत्न केला. पण आता मात्र अचानक त्याने एकावर एक जोरदार खुलासे करणे सुरू केले आहे. अलीकडे बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाच्या ‘भारत’ सोडल्याच्या निर्णयावर सलमानने स्पष्ट शब्दांत आपली नाराजी बोलून दाखवली. ‘भारत’ सोडण्याच्या निर्णयामागे तिची आपली कारणे होती. पण आमचा प्रोजेक्ट अटकला. आम्हाला आधी ठाऊक असते तर कदाचित आम्ही काहीतरी मार्ग काढला असता. ‘भारत’ सोडताना मी साखरपुडा करतेय, असे तिने मला सांगितले. या कारणासाठी चित्रपट सोडायची काय गरज आहे, असे मी तिला म्हणालो. यावर मला लग्न करायचेयं, असे ती म्हणाली. मी त्यालाही होकार दिला. ‘भारत’मध्ये प्रियांकाचे काम केवळ ७०-८० दिवसांचे होते. लग्न करायचे तर चार दिवस तयारीला अन् चार दिवस लग्नाला लागतात. आठ दिवसांचे लग्न आणि मग हनीमून. आम्ही अ‍ॅडजस्ट करायला तयार होतो. आम्ही सांभाळून घेऊ, असे आम्ही तिला सांगितले. पण नंतर मला हा चित्रपट करायचाच नाही, असे तिने स्पष्ट केले. माझ्यासोबत काम करायचे म्हणून प्रियांकाने माझी बहीण अर्पिला हजारदा फोन केला होता. मला सलमानसोबत काम करायचेयं, असे अर्पिताला ती अनेकदा म्हणाली होती. तिने अली अब्बासलाही फोन केला होता. माझ्यासाठी रोल असेल तर बघ, असे ती म्हणाली होती. मग अचानक तिने ‘भारत’ का सोडला, मला ठाऊक नाही. याची दोनचं कारणे असू शकतात. एक तर तिला माझ्यासोबत काम करायचे नसेल किंवा कदाचित बॉलिवूडमध्ये ती इंटरेस्टेड नसेल. तिला हॉलिवूडमध्येचं काम करायचे असेल, असे सलमान म्हणाला.सलमानच्या या बोलण्यावरून तो प्रियांकावर संतापलायं, हे स्पष्ट आहे. आता याच्या पुढचा अध्याय कळेलचं.

 

टॅग्स :सलमान खानप्रियंका चोप्राभारत सिनेमा