भाईजान नाराज,भन्साळीही नाराज! प्रियांका चोप्राने सोडला आणखी एक चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 10:16 AM2018-08-06T10:16:55+5:302018-08-06T10:20:08+5:30

‘भारत’पाठोपाठ संजय लीला भन्साळींच्या एका बॉलिवूड प्रोजेक्टलाही प्रियांका चोप्राने टाटा-टाटा, बाय-बाय केल्याची खबर आहे.

priyanka chopra left sanjay leela bhansali gangster film | भाईजान नाराज,भन्साळीही नाराज! प्रियांका चोप्राने सोडला आणखी एक चित्रपट!

भाईजान नाराज,भन्साळीही नाराज! प्रियांका चोप्राने सोडला आणखी एक चित्रपट!

googlenewsNext

सध्या प्रियांका चोप्रा पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही कारणांनी चर्चेत आहे. ऐनवेळी सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटातून तिने अंग काढून घेतले. तिच्या या निर्णयाची बरीच चर्चा झाली. ऐनवेळी अशाप्रकारे ‘दगा’ देऊन तिने भाईजानची नाराजीही ओढवून घेतली. पण कदाचित प्रियांकाला याने काहीही फरक पडत नाही. होय, कारण आता ‘भारत’पाठोपाठ संजय लीला भन्साळींच्या एका बॉलिवूड प्रोजेक्टलाही तिने असाच टाटा-टाटा, बाय-बाय केल्याची खबर आहे.
होय, आम्ही बोलतोय ते संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई कोठेवाली’ या गँगस्टर चित्रपटाबद्दल. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे वर्षभरापूर्वी या चित्रपटाबद्दलची बातमी आली होती. भन्साळी आणि प्रियांका या चित्रपटासाठी एकत्र येणार, अशी बातमी होती. पण आता प्रियांकाने हा चित्रपट सोडल्याचे कळतेय. ‘भारत’प्रमाणेच हा चित्रपट करण्यासही प्रियाकांने नकार दिला आहे. Cowboy Ninja Viking या हॉलिवूड चित्रपटासाठी प्रियांकाने भन्साळींची नाराजी ओढवून घेतल्याचे समजते. तूर्तास प्रियांकाच्या या निर्णयाने भन्साळी अचंबित आहेत. सूत्रांचे मानाल तर हा चित्रपट करण्यास भन्साळी तयार होते. पण आता प्रियांकाने हा चित्रपट सोडला म्हटल्यावर त्यांनी तो थंडबस्त्यात टाकला आहे.
सलमान आणि भन्साळी अशा दोघांचेही चित्रपट सोडण्यामागे नेमके काय कारण आहे, हे प्रियांकालाचं ठाऊक. पण प्रियांकाला हॉलिवूड फिव्हर चढला, असे आता म्हटले जावू लागले आहे.
तूर्तास प्रियांका अमेरिकन सिंगर निक जोनाससोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. दोघेही लवकरचं लग्न करणार, अशी बातमी आहे. सध्या तू तिथे मी,अशारितीने प्रियांका व निक एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

 

Web Title: priyanka chopra left sanjay leela bhansali gangster film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.