Join us

या अभिनेत्रीचा प्रत्येक फोटो झूम करून पाहातो सलमान खान, त्यानेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 19:24 IST

एका अभिनेत्रीचे सगळे फोटो तो झुम करून पाहातो अशी त्याने एका कार्यक्रमाच्या दरम्यान कबुली दिली आहे. 

ठळक मुद्देसलमानने कतरिनाकडे पाहात उत्तर दिले की, मी कधीही कोणत्या मुलीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन असे काहीही केलेले नाहीये. हा, पण कतरिनाचे सगळेच फोटो मी झुम करून पाहातो. 

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव कित्येक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे यात संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ आणि युलिया वंतूर यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्याची सगळीच प्रेमप्रकरणं प्रचंड गाजली आहेत. आजवर इतक्या अभिनेत्रींसोबत सलमानचे नाव जोडले गेले असले तरी सलमान आजही सिंगल आहे. सलमान लग्न कधी करणार हा प्रश्न नेहमीच त्याच्या चाहत्यांना पडतो.

सलमानला आज प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक सिक्रेट जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांची इच्छा असते. त्यानेच त्याच्या आयुष्यातील एक खास सिक्रेट उमंग या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितले आहे. एका अभिनेत्रीचे सगळे फोटो तो झुम करून पाहातो अशी त्याने या कार्यक्रमाच्या दरम्यान कबुली दिली आहे. 

उमंग या कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकताच सोनी वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या प्रोमोत सलमान आणि कतरिना कैफला कपिल शर्मा स्टेजवर बोलवताना दिसत आहे. सलमान स्टेजवर आल्यावर कपिल त्याला विचारत आहे की, सोशल मीडियावर मला तुमचे अनेक फॅन्स विशेषतः मुली मेसेज करून विचारतात की, तुम्ही कोणत्या मुलीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तिचा फोटो झुम करून कधी पाहिला आहे का? या प्रश्नावर एकही सेकंदाचा विचार न करता सलमानने कतरिनाकडे पाहात उत्तर दिले की, मी कधीही कोणत्या मुलीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन असे काहीही केलेले नाहीये. हा, पण कतरिनाचे सगळेच फोटो मी झुम करून पाहातो. 

सलमानचे हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला तर कतरिना लाजताना दिसली. प्रेक्षकांना उमंग हा कार्यक्रम 26 जानेवारीला सोनी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफ