सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाची खूप चर्चा होती. हा चित्रपट एप्रिल २०२६ मध्ये रिलीज होणार होता. परंतु काही कारणाने त्याची रिलीज डेट पुढे ढकलली. अशातच सलमान खान आणि सिनेमाच्या टीमने ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचं नाव बदललं आहे. हा चित्रपट आता आता ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या नावाने येणार आहे. नुकतंच या बहुचर्चित चित्रपटाचे अधिकृतपणे नवीन नाव जाहीर करण्यात आले आहे.
निर्मात्यांनी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाचा एक दमदार नवीन पोस्टरही शेअर केला आहे, ज्यातून केवळ नावातील बदलच नाही तर आजच्या जगासाठी अत्यंत महत्त्वाचा संदेशही देण्यात आला आहे. या नव्या शीर्षकातील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची टॅगलाइन — “मे वॉर रेस्ट इन पीस”. या विचारातून सलमान खानने एक मोठा आणि अर्थपूर्ण संदेश दिला आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत संपूर्ण जगात शांततेची आशा व्यक्त करणारी ही टॅगलाईन सर्वांना आवडली आहे.
हा चित्रपट गलवान वॅलीमधील ऐतिहासिक घटनेपासून प्रेरित आहे. ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान एक प्रभावी विचार प्रेक्षकांसमोर मांडत आहे, जो लोकांच्या मनाला भिडत आहे. अद्याप या चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट समोर आली नसली तरीही १४ ऑगस्ट २०२६ ला हा चित्रपट रिलीज होईल अशी शक्यता आहे. याआधी हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता. परंतु काही कारणांनी निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. अपूर्व लाखिया यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून सलमान खानसह चित्रांगदा सिंग चित्रपटात झळकणार आहे.
Web Summary : Salman Khan's 'Battle of Galwan' is now 'Matrubhoomi: May War Rest in Peace.' The film's new poster shares a message of peace. Release date is expected to be August 14, 2026. Apurva Lakhia directs; Chitrangada Singh stars.
Web Summary : सलमान खान की 'बैटल ऑफ गलवान' अब 'मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस' है। फिल्म का नया पोस्टर शांति का संदेश देता है। फिल्म 14 अगस्त, 2026 को रिलीज होने की उम्मीद है। अपूर्व लाखिया निर्देशित; चित्रांगदा सिंह अभिनीत।