Salman Khan Bodyguard Shera Viral Video: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने मोठा काळ अभियन क्षेत्रामध्ये गाजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने मिळत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शेरा याच्यावर आहे. शेरा हा आपलं कर्तव्य कायम चोखपणे बजावताना दिसतो. गेल्या कित्येक वर्षांपासून तो सलमानची सुरक्षा करतोय. अशातच आता सलमान खान आणि शेरा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
रविवारी सकाळी मुंबई विमानतळावर सलमान खान स्पॉट झाला. यावेळी बॉडीगार्ड शेरा हा सलमान खानसाठी गर्दीतून मार्ग मोकळा करताना दिसला. पण, यावेळी त्याचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. तो पापाराझींवर ओरडताना दिसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेराला ओरडताना पाहून सलमान खान हा कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याच्या गाडीकडे जाताना दिसला.
दरम्यान, आज सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. बॉम्बने सलमान खानची गाडी उडवून देऊ त्याबरोबरच सलमानला घरात घुसून मारू, असा मेसेज मुंबईतील वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर आला आहे.
सलमानच्या विश्वासू बॉडिगॉर्ड शेराविषयी...
शेराचं खरं नाव गुरमीत सिंह जॉली नाव असं आहे. पण, तो शेरा म्हणूनच ओळखल्या जातो. सलमानसाठी शेरा त्याच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. सलमान जेथे जातो तेथे एका दिवसापूर्वीच आढावा घेण्यासाठी शेरा पोहोचतो. बॉडी बिल्डिंगमध्ये शेरा जुनियर मिस्टर मुंबई आणि जुनियर मिस्टर महाराष्ट्र जिंकलेला आहे. सलमानच्या सांगण्यावरूनच त्याने इवेंट मॅनेजमेंट कंपनी विझक्राफ्ट आणि 'टायगर सिक्यॉरिटी' अशा कंपन्या देखील स्थापित केल्या आहेत. या कंपनीच्या माध्यमातून तो दुसऱ्यांनाही कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरवतो.