Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाईजान ऐकत नाय! 'मातृभूमी'च्या रिलीजआधीच सलमानने केली नव्या सिनेमाची घोषणा, नयनतारा मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:07 IST

सलमानने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. पण, सलमानचा हा चित्रपट २०२६च्या ईदला नव्हे तर पुढच्या वर्षी म्हणजेच २०२७च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या आगामी मातृभूमी सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. असं असतानाच सलमानने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. पण, सलमानचा हा चित्रपट २०२६च्या ईदला नव्हे तर पुढच्या वर्षी म्हणजेच २०२७च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.  या नव्या चित्रपटाचे सध्या ‘एसव्हीसी ६३’ असे नाव ठेवण्यात आले असून त्याचे दिग्दर्शन वंशी पैदीपल्ली करत आहेत. या चित्रपटात सलमानसोबत नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर या सिनेमाची निर्मिती दिल राजू करत आहेत. 

सलमानने नव्या सिनेमाची घोषणा करत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो म्हणतो, “थोडा पुढचा विचार करायला हवं, म्हणून ईदची घोषणा केली. काळजी करू नका, या चित्रपटाबद्दलही योग्य वेळ आल्यावर सांगू. थोडा संयम ठेवा. माझ्यासारखीच तुम्हालाही वाट पाहावी लागेल. तुमची जशी अवस्था आहे तीच माझीही आहे".  अनेक वर्षांपासून सलमान ईदच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित करत त्याच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट देतो. ॲक्शन, भावना, संगीत आणि जबरदस्त लोकाभिमुखता यांचा संगम असलेले त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच भावले आहेत. ‘वॉन्टेड’, ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’ आणि ‘भारत’या चित्रपटांनी ईदच्या काळात मोठे यश मिळवले आहे.

सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला अभिनेता आहे, ज्याच्या सलग १७ चित्रपटांनी शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आणि बॉक्स ऑफिसचे मापदंडच बदलून टाकले. त्याच्या नावावर दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारे अनेक चित्रपट आहेत. तसेच ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’ सारख्या चित्रपटांनी तीनशे कोटींचाही टप्पा पार केला आहे. आता 'मातृभूमी' सिनेमाच्या रिलीजकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan Announces New Film Before 'Matrubhoomi' Release: Nayanthara to Star

Web Summary : Even before 'Matrubhoomi' releases, Salman Khan announced a new film, ‘SVC 63,’ slated for a 2027 Eid release. Nayanthara will star, with Vamshi Paidipally directing and Dil Raju producing. Salman shared a video, asking fans to wait patiently for details. He is known for Eid releases like 'Wanted' and 'Bajrangi Bhaijaan'.
टॅग्स :सलमान खाननयनतारा