Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका 'भारत' सोडल्याने सलमान खान संतापला, घेतला हा मोठा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 13:33 IST

प्रियंका आता 'भारत' मध्ये दिसणार नाही याची घोषणा स्वत: दिग्दर्शक अलि जफर यांनी ट्विटरवरून केली. आता प्रियंकाच्या या निर्णयामुळे सलमान खान चांगलाच रागावल्याची चर्चा होत आहे. 

(Image Credit: www.freshboxoffice.com)

मुंबई : सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'भारत' या सिनेमातून वेळेवर काढता पाय घेतल्यांतर प्रियंका चोप्राच्या अव्यवहारीपणाची चर्चा होऊ लागली आहे. प्रियंका आता 'भारत' मध्ये दिसणार नाही याची घोषणा स्वत: दिग्दर्शक अलि जफर यांनी ट्विटरवरून केली. आता प्रियंकाच्या या निर्णयामुळे सलमान खान चांगलाच रागावल्याची चर्चा होत आहे. 

सगळंकाही ठरल्यानंतर वेळेवर 'भारत' सिनेमातून अंग काढून घेतल्याने सलमान खान प्रियंकावर चांगलाच चिडला असल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर त्याला विश्वासही बसत नाहीये की, प्रियंकाने अचानक सिनेमा सोडला. प्रियंकाच्या या निर्णयामुळे सलमान चांगलाच चिडला असून त्याने यापुढे कधीही प्रियंकासोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये होत आहे. पण असा काही निर्णय घेतल्याची अधिकृत माहिती सलमानकडून मिळाली नाहीये.

सलमान खान आणि प्रियंका चोप्रा यांच्यातील नांत आधीही फार चांगलं नव्हतं. असे म्हणतात की, या दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं असलं तरी दोघांमध्ये कोल्ट वॉर सुरु होतं. दुसरीकडे बहीण अर्पिताच्या सांगण्यावरुन सलमानने प्रियंकाला सिनेमात घेतल्याची माहिती आहे. पण आता प्रियंकाने वेळेवर सिनेमा सोडल्याने दोघांमधील दरी आणखी वाढली आहे. 

दरम्यान, आता अशी चर्चा होत आहे की, प्रियंकाची 'भारत' मधील भूमिका कतरिना कैफ साकारणार आहे. प्रियंका सिनेमातील आपल्या भूमिकाच्या स्पेसमुळे खूश नसल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात आणखीही काही महत्वाच्या भूमिका असल्याने तिला असं तिच्या भूमिकेला कमी स्पेस मिळणार असे वाटत आहे. पण आता ती या सिनेमाचा भाग नाहीये.

 

अली अब्बास यांनी ट्विट करुन सांगितले की, 'प्रियंका आता भारत सिनेमाच भाग नाहीये. तिने हा निर्णय निकमुळे घेतल्याचे सांगितले आहे. मी तिच्या या निर्णयामुळे खूप आनंदी आहे. भारतच्या संपूर्ण टीमकडून प्रियंका खूप शुभेच्छा".

टॅग्स :सलमान खानप्रियंका चोप्राबॉलिवूडनिक जोनास