विकी कौशलने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आता विकीपाठोपाठ त्याचा भाऊ सनी कौशल हाही फिल्मी दुनियेत नशीब आजमावतो आहे. असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात करणा-या सनीने ‘सन शाईन म्युझिक टुर्स अॅण्ड ट्रव्हल्स’ या चित्रपटातून डेब्यू केला. यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’या चित्रपटात झळकला. लवकरच ‘भांगडा पा ले’ या चित्रपटात तो लीड रोलमध्ये दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाबद्दल एक खास खबर आहे. होय, सनीच्या या चित्रपटात एक जुने सुपरहिट गाणे रिक्रिएट केले जाणार आहे. हे गाणे कोणते, हे तुम्ही ओळखले असेल. होय, शाहरूख खान व सलमान खानच्या ‘करण अर्जुन’मधील ‘भंगडा पा ले’ हेच ते गाणे. ‘करण अर्जुन’चे हे गाणे योगायोगाने चित्रपटाच्या टायटलला मॅच करणारे आहे. त्यामुळे या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
विकी कौशलचा भाऊ सनी कौशल म्हणणार ‘भंगडा पा ले’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 16:22 IST
विकी कौशलने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आता विकीपाठोपाठ त्याचा भाऊ सनी कौशल हाही फिल्मी दुनियेत नशीब आजमावतो आहे.
विकी कौशलचा भाऊ सनी कौशल म्हणणार ‘भंगडा पा ले’!
ठळक मुद्दे यापूर्वी सनी कौशल अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’मध्ये दिसला. आता ‘भंगडा पा ले’या चित्रपटात सनी लीड रोल साकारताना दिसणार आहे.