Join us
Daily Top 2Weekly Top 5

२३ वर्षानंतरही सलमानच्या 'तेरे नाम'ची क्रेझ कायम! री-रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, किती केली कमाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:01 IST

बॉक्स ऑफिसवर सलमानच्या 'तेरे नाम'ची जादू! पुन:प्रदर्शनानंतर सिनेमाने दोन दिवसांतच केलं इतकं कलेक्शन

Tere Naam Re-Release Box Office Collection : 'तेरे नाम' हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक सुपरहिट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २००३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे सलमान खान आणि भूमिका चावला घराघरात पोहोचले. 'तेरे नाम' हा एक रोमँटिक सस्पेन्स पठडीतील चित्रपट होता. या चित्रपटात सलमान खानने राधे ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. तर भूमिका चावला ही राधेच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. त्या काळात सलमानची हेअरस्टाईल, संवादफेक आणि भावनिक अभिनय प्रचंड ट्रेंड झाला होता. आता जवळपास २२ वर्षांनी  हा सिनेमा पुन प्रदर्शित करण्यात आला असून आजही तेरे नामची क्रेझ कायम आहे.

'तेरे नाम' रि-रिलीज झाल्यानंतर  बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.२३ वर्षांपूर्वी आलेल्या या सिनेमाचं बजेट फक्त १० कोटी होतं आणि जगभरात या सिनेमाने साधारण २२ कोटींचा व्यवसाय केला होता. आता या सिनेमाने पुन प्रदर्शनानंतर किती कमाई केली... जाणून घेऊया...

सलमान खान आणि भूमिका चावला स्टारर "तेरे नाम" हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी २५ लाख रुपयांची कमाई केली. पिंकव्हिलाच्या अहवालानुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही २५ लाख रुपयांचं कलेक्शन केलं आहे.यावरून चित्रपटाचं एकूण कलेक्शन ५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

पुन: प्रदर्शनाचा 'बॉर्डर' २ ला फटका?

सनी देओल स्टारर 'बॉर्डर २' चित्रपट प्रदर्शित होऊन ३७ दिवस झाले आहेत. चित्रपटाने ३७ व्या दिवशी ३२७.४४ कोटींची कमाई केली आहे.पण, ३७ व्या दिवशी सिनेमाने फक्त २२ लाख रुपये इतकी कमाई केली. हा आकडा  'तेरे नाम' च्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा कमी आहे. यावरून सलमान आणि भूमिकाचा हा सिनेमा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहात खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Tere Naam' craze endures after 23 years, box office success!

Web Summary : Salman Khan's 'Tere Naam' re-release is a box office hit! The film, originally made for ₹10 crore, earned ₹22 crore initially. After 23 years, it's still drawing crowds, earning ₹25 lakh on each of its first two days.
टॅग्स :सलमान खानभूमिका चावलाबॉलिवूडसिनेमा