Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती पुन्हा एकदा चर्चेत, काय आहे खास कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:34 IST

दिव्या भारती ही तिच्या चाहत्यांच्या मनात आजही जिवंत आहे

दिव्या भारती ही एक लोकप्रिय अभिनेत्री होती, जिने ९० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. दिव्याने बॉलिवूडपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.  दिव्या भारती आज या जगात नाही, पण ती तिच्या चाहत्यांच्या हृदयात कायम जिवंत आहे. आता तिच्या चाहत्यांसाठी खास बातमी आहे. दिव्या भारतीचा पती साजिद नाडियाडवाला लेकाच्या डेब्यू चित्रपटासाठी खास नाव निवडलं आहे. ज्याच कनेक्शन थेट दिव्या भारती हिच्याशी आहे.

 बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुभान नाडियाडवाला लवकरच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.  तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्याच्या पहिल्या चित्रपटाचे शुटिंगही सुरू झालं आहे. मिड-डे न्यूजच्या वृत्तानुसार, सुभानचा हा चित्रपट १९९७ ला प्रदर्शित झालेल्या दिव्या भारतीच्या 'दिवाना' चित्रपटापासून प्रेरित आहे. या चित्रपटातील गाण्यावरुन सुभानच्या चित्रपटाचं नाव 'ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं' असं ठेवलं आहे.  मात्र, टायटलची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. 

दिव्या आणि साजिद यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दोघांची भेट १९९२ मध्ये 'शोला और शबनम' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.  त्यानंतर दिव्या भारती आणि साजिद यांच्या सातत्यानं भेटीगाठी होऊ लागल्या. त्या दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुललं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. साजिद आणि दिव्या यांनी १० मे १९९२ ला लग्न केलं. साजिद यांच्या वर्सोवा इथल्या तुलसी अपार्टमेंटमध्ये त्या दोघांचा निकाह झाला. मीडिया रिपोर्टनुसार निकाह करण्याआधी दिव्याने इस्लामचा स्वीकार केला अन् नाव बदलून सना ठेवलं होतं. दुर्दैवाने, दिव्या भारती यांचे १९९३ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी निधन झालं. सुभानचा हा चित्रपट दिव्याच्या चाहत्यांना भावनिक श्रद्धांजली आहे. सुभान हा साजिद  यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आ

टॅग्स :साजिद नाडियाडवालाबॉलिवूड